सिंहस्थ प्रतिक्रिया ===१ जोड
By Admin | Updated: August 11, 2015 22:11 IST2015-08-11T22:11:40+5:302015-08-11T22:11:40+5:30
अनेक कुंभमेळे पाहिले

सिंहस्थ प्रतिक्रिया ===१ जोड
अ ेक कुंभमेळे पाहिले असा त्रास कधी झाला नाही?यशवंत महाराज पटांगणाच्या लगतच वरती आमचा वाडा असून, या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त अद्यापही अनेक कामे सुरू आहेत. जेसीबी यंत्राने कामे करताना महापालिकेच्या कर्मचार्यांनी भूमिगत गटारीचे पाइप फोडली त्यामुळे खूप दुर्गंधी सुटते आहे. त्यामुळे डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्याप्रमाणे ध्वनिवर्धकाचा आवाज, गोंधळ ठिकठिकाणी बॅरिकेड्स असे अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. यापूर्वी अनेक कुंभमेलो पाहिले; परंतु असा त्रास कधी झाला नाही. - वामन देशपांडे (सेवानिवृत्त पोस्ट मास्टर)देशपांडे वाडा, यशवंत महाराज पटांगण)घाणीचे साम्राज्य वाढलेसिंहस्थ कुंभमेळ्यामुळे सुधारणा झाल्या असे दिसत असले तरी अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसते. गोदाघाटालगत कचरा उचलला जात नाही. काही ठिकाणी गवतही वाढले आहे. मोकाट कुत्रे फिरतात. गटार फुटल्याने घाण पाणी वाहत असते. यासंबंधी नगरसेवक, लोकप्रतिनिधींना तक्रार केली तरीही दुर्लक्ष होत आहे. म्हणजे एकीकडे बाहेर गावाहून येणार्यांची सोय करायची आणि स्थानिक लोकांचे मात्र हाल होत आहेत.- संजय नेरकरमेस व्यवसायिकयशवंत महाराज पटांगणक्रॉँक्रीटीकरण उखडलेलेवाहनांची अडवणूकगोरेराम लेनपासून गोदाघाटाकडे जाणार्या रस्त्यावर ठिकठिकाणी काँक्रीटीकरण उखडल्याने वाहने घसरतात. त्यातच या ठिकाणी आता वाहने लावण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी जायचे कोठे, समजा कोणी आजारी पडले तर त्यासाठी वाहने कोठून न्यायची असा प्रश्न पडतो. यातून मार्ग काढावा. आम्हाला पास देण्यात यावेत. - प्रतिभा अवस्थीगोरेराम लेन