शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांचे संकेत; पक्ष पुनर्बांधणीचे कार्य तत्काळ सुरू करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 06:29 IST

कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

राम मगदूम/प्रकाश बेळगोजी

बेळगाव (कर्नाटक) : येथे आयोजित पक्ष कार्यकारिणीच्या ऐतिहासिक बैठकीत काँग्रेसने गुरुवारी १३ महिन्याचे राजकीय अभियान जाहीर केले. यात पदयात्रांसह विविध मुद्द्यांवर भर देण्याचे निश्चित करण्यात आले. प्रामुख्याने संविधानावर होत असलेल्या कथित हल्ल्यासह महागाई व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही या राजकीय अभियानात भर दिला जाईल.

याशिवाय काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक सुधारणांसह पक्षाच्या पुनर्बांधणीचे कार्य तत्काळ सुरू करण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत येथे घेण्यात आला. वर्षभर देशात ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ अभियान चालवण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले. या ऐतिहासिक बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिाकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते व माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल आदी नेते उपस्थित हाेते.

काय आहेत दोन प्रस्ताव...

गुरुवारी बैठकीनंतर पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश, माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बैठकीबाबत माहिती दिली. बैठकीत दोन प्रस्ताव पारित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यातील एक महात्मा गांधी यांच्यासंबंधी तर दुसरा प्रस्ताव राजकीय आहे. आगामी २०२५ हे वर्ष पक्षासाठी मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदलाचे वर्ष असल्याचे सांगून या काळात मोठे बदल केले जातील, असे त्यांनी नमूद केले. आता सुरू होणारे ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ अभियान एक वर्ष चालेल, असे ते म्हणाले. एप्रिलमध्ये महात्मा गांधी यांचे जन्मस्थळ असलेल्या पोरबंदर (गुजरात) येथे काँग्रेसचे अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याचे वेणुगोपाल यांनी नमूद केले. या अभियानात पदयात्रा होतील. जिल्हा व राज्य पातळीवर जाहीर सभांचे आयोजन केले जाईल.

दिल्लीतील सत्ताधाऱ्यांकडून महात्मा गांधीजींची विचारधारा धोक्यात : सोनिया गांधी

दिल्लीतील सत्ताधारी आणि त्यांच्याशी संबंधित संस्थाकडून महात्मा गांधीजींची विचारधारा धोक्यात आली आहे, असा आरोप करतानाच महात्मा गांधींच्या वारशाचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही स्वतःला समर्पित करतो. तो आमच्या प्रेरणेचा मूळ स्रोत होता आणि राहील, असे काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

बाबासाहेबांच्या सन्मानासाठी अखेरपर्यंत लढू; काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी व्यक्त केला निर्धार

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अवमान केला आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्यच करायला तयार नाहीत. आम्ही डॉ. आंबेडकरांचा अवमान कदापिही सहन करू शकत नाही. डॉ. आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांची विचारधारा जपण्यासाठी, तिच्या सन्मानासाठी या सरकारविरुद्ध अखेरच्या श्वासापर्यंत लढू, असा निर्धार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला.  

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे