हळदी उत्पादनात घट होण्याची चिन्हे; व्यापाऱ्यांचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 02:52 IST2020-12-19T02:51:23+5:302020-12-19T02:52:10+5:30
पुढील हंगामात दर चांगला मिळण्याची शक्यता

हळदी उत्पादनात घट होण्याची चिन्हे; व्यापाऱ्यांचा अंदाज
- अविनाश कोळी
सांगली : पूर, अतिवृष्टी यामुळे तेलंगणा, महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील हळदीच्या उत्पादनात घट झाली असून त्याचा जानेवारी २०२१ पासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आवक घटतानाच मागणी वाढण्याची शक्यता असल्याने हळदीला चांगला दर मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
तेलंगणा व महाराष्ट्रात हळदीच्या पिकाला प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे. तामिळनाडू, कर्नाटकातही तशीच स्थिती आहे. २०१९-२० या वर्षात तेलंगणात ५५ हजार हेक्टरमध्ये हळद लागवड झाली होती. यंदा ती ४१ हजार हेक्टरपर्यंत घटली आहे. महाराष्ट्रातही १५ टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.
दा हळदीच्या उत्पादनात १५ टक्के घट होण्याचा अंदाज आहे. जर देशांतर्गत व परदेशातील हळदीची मागणी वाढत राहिली, तर उत्पादकांना दरामध्ये चांगला दिलासा मिळू शकेल. जुना माल शिल्लक राहून नुकसानीत गेलेल्या लोकांनाही त्यातून फायदा मिळेल.
- मनोहरलाल सारडा, व्यापारी