शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये पक्षाने प्रचारात सहभागी करून न घेतल्याने सिद्धू नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 05:58 IST

देशात विविध ठिकाणी काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये रंग भरणारे पंजाबचे मंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना दस्तुरखुद्द पंजाबमध्ये प्रचार करण्यास आडकाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत.

 - बलवंत तक्षकचंदिगढ : देशात विविध ठिकाणी काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये रंग भरणारे पंजाबचे मंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना दस्तुरखुद्द पंजाबमध्ये प्रचार करण्यास आडकाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत.निवडणुकांसाठी राज्यात प्रचार करण्यापासून रोखल्याच्या दुसऱ्याच दिवशी सिद्धू पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावर बरसले. एका मुलाखतीत सिद्धू म्हणाले की, मला पंजाबमध्ये प्रचार करू द्यायचा नाही, असे नेतृत्वाने ठरविले आहे. पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागा जिंकण्याच्या लढाईत काँग्रेस कमी पडल्यास त्यास मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह जबाबदार असतील. विजयाचे श्रेय जसे त्यांना मिळेल, तसे पराभवाची जबाबदारीही त्यांना स्वीकारावी लागेल.कॅप्टन अमरिंदरसिंग व नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात अनेक मतभेद आहेत. सिद्धू पाकच्या दौºयावर गेले होते. तिथे त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांना आलिंगन दिल्याबद्दल अमरिंदरसिंग यांनी कडक टीका केली होती.राहुल हेच माझे नेतेसिद्धू म्हणाले की, माझे नेते कॅ. अमरिंदरसिंग नसून राहुल गांधी आहेत. यानंतर ते मंत्रिमंडळात एकाकी पडले. काही मंत्र्यांनी सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सरतेशेवटी ज्येष्ठांनी मध्यस्थी करून दोघांमध्ये समझोता घडवून आणला. मात्र आता पंजाबमध्येच प्रचार करू दिला जात नसल्याने ते संतापले आहेत.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसPunjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक 2019