शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

कोरोनाने पोखरले भारतातील मुलांचे बालपण, देशातील ३७ कोटी मुलांबाबत सीएसईचा चिंता वाढवणारा अहवाल

By बाळकृष्ण परब | Published: February 26, 2021 3:40 PM

Indian Children in Covid-19 : देशातील कोरोनाचा संसर्ग कमीजास्त होत आहे. तसेच कोरोनावरील लसही उपलब्द झाली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या साथीचे दुष्परिणाम पुढील अनेक वर्षे कायम राहणार आहेत.

ठळक मुद्देदेशातील ३७.५ कोटी मुले दीर्घकाळापर्यंत कायम राहणाऱ्या कोरोनाच्या दुष्परिणामांच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता त्यांची रोगप्रतिकार क्षमता प्रभावित झाल्यामुळे हे दुष्परिणाम कमी वजन, कमी उंची आणि मृत्यूदरात वाढ या रूपात दिसतीलकोरोनामुळे जगभरात ५० कोटींहून अधिक मुलांची शाळा सुटली आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक मुले ही भारतात आहेत

नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा संसर्ग कमीजास्त होत आहे. तसेच कोरोनावरील लसही उपलब्द झाली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या साथीचे दुष्परिणाम पुढील अनेक वर्षे कायम राहणार आहे. (corona virus) विशेष करून लहान मुलांच्या शारीरिक विकासावर कोरोनाचा मोठा परिणाम होणार आहे. (Indian Children in Covid-19 ) कोरोनामुळे मुलांच्या मृत्युदरात वाढ होणार असून, त्यांचे शिक्षणही विस्कळीत होण्याची शक्यता आहे, ही भीती सेंटर फॉर सायन्स अँड  एन्व्हायरमेंट (सीएसई) च्या वार्षिक अहवालामध्ये स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायर्मेंट (सीएसई) च्या वार्षिक अहवालात स्टेट ऑफ इंडियाज एन्वायर्मेंट २०२१ मधून व्यक्त करण्यात आली आहे. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांच्यासह देशभरातील ६० हून अधिक पर्यावरणवाद्यांनी एकत्रितपणे हा अहवाल गुरुवारी संध्याकाळी प्रसिद्ध केला आहे.  (side effects of Covid-19 , CSE report raises concerns about 37 crore children in India)या अहवालानुसार, भारत आता महामारी जनरेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील ३७.५ कोटी मुले (नवजात अर्भकांपासून ते १४ वर्षांच्या मुलांपर्यंत) दीर्घकाळापर्यंत कायम राहणाऱ्या कोरोनाच्या दुष्परिणामांच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. त्यांची रोगप्रतिकार क्षमता प्रभावित झाल्यामुळे हे दुष्परिणाम कमी वजन, कमी उंची आणि मृत्यूदरात वाढ या रूपात दिसतील. तसेच शैक्षणिक नुकसानापर्यंत दुष्परिणाम दिसून येणार आहेत. जगभरात ५० कोटींहून अधिक मुलांची शाळा सुटली आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक मुले ही भारतात आहेत. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी सांगितले की, आता कोरोना विषाणू आमच्यासाठी दीर्घकाळासाठी काय सोडून जाणार आहे याचा तपास करण्याची वेळ आली आहे. एक पिढी अस्वस्थता, कुपोष, गरिबी आणि शैक्षणिक लाभांबाबत दुर्बलतेने घेरली गेली आहे. त्याबरोबरच पर्यावरणाचा निरंतर विकासासाठी उपयोग कऱण्याचेही आव्हान आहे. जेणेकरून पर्यावरणीय आव्हानांच्या काळात आम्ही उदरनिर्वाह आणि पोषण सुरक्षेबाबत सुधारणा करू शकू.  सीएसईच्या अहवालात म्हटले आहे की, संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्यानंतरही भारतात कोरोनाचा संसर्ग थांबू शकला नाही. देशातील लोकसंख्येचा मोठा भाग हा झोपडपट्ट्या तसेच दाट लोकवस्तीमध्ये राहतो. तिथे ना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची उपलब्धता आहे. ना तिथे योग्य स्वच्छता होते. अशा परिस्थितीत संसर्गाची शक्यता सातत्याने कायम असते.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकIndiaभारतHealthआरोग्य