वॉटरप्रूफ साडीनंतर आता ७० लाखांच्या घड्याळामुळे सिद्धरामय्या चर्चेत!

By Admin | Updated: February 12, 2016 15:01 IST2016-02-12T11:56:57+5:302016-02-12T15:01:27+5:30

पत्नीसाठी तब्बल १ लाख रुपयाची वॉटरप्रूफ साडी विकत घेणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आता हातात तब्बल ७० लाख रुपयांचे घड्याळ घातल्यामुळे पुन्हा चर्चेत आले.

SidarRayya debut now after a waterproof sari, 70 lakhs clock! | वॉटरप्रूफ साडीनंतर आता ७० लाखांच्या घड्याळामुळे सिद्धरामय्या चर्चेत!

वॉटरप्रूफ साडीनंतर आता ७० लाखांच्या घड्याळामुळे सिद्धरामय्या चर्चेत!

>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. १२ - पत्नीसाठी तब्बल १ लाख रुपयाची वॉटरप्रूफ साडी विकत घेणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आता हातात तब्बल ७० लाख रुपयांचे घड्याळ घातल्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्यामुऴे आता पोटनिवडणूक व ग्रामपंचायत निवडणुकीतील वातावरण भलतंच तापलं आहे. 
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सिद्धरामय्या यांच्या घड्याळाचा मुद्दा छेडत त्यांच्याकडे ७० लाख रुपयांचे घड्याळ कुठून आले असा प्रश्न उपस्थित केला. तसेच त्यांचा चष्माही २ लाख रुपयांचा असल्याचा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे.
सिद्धरामय्या यांनी गेल्या महिन्यात पत्नीसाठी तब्बल १.०८ लाखाची वॉटरप्रूफ साडी खरेदी केली. कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीच्या साडया प्रदर्शनाच्या उदघाटनच्यावेळी सिद्धरामय्या यांनी पत्नी पार्वतीसाठी सोन्याचे धागे असलेली नारंगी रंगाची साडी खरेदी केली. मात्र विकत घेण्यापूर्वी त्यांनी साडीवर लिटरभर पाणी त्या ओतून ती ओली होत नाही ना याची खात्रीही करून घेतली होती.
 

Web Title: SidarRayya debut now after a waterproof sari, 70 lakhs clock!