शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा सिब्बल महाभियोग प्रस्तावाला म्हणाले होते असंवैधानिक, व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 16:02 IST

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेसने महाभियोग प्रस्ताव आणल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले होते. मात्र आता कपिल सिब्बल यांचा 8 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल सिब्बल...

नवी दिल्ली - सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेसने महाभियोग प्रस्ताव आणल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले होते. मात्र आता कपिल सिब्बल यांचा 8 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल सिब्बल हे एखाद्या न्यायाधीशावर महाभियोग प्रस्ताव आणणे हे असंवैधानिक असल्याचे सांगताना दिसत आहेत. हा व्हिडिओ 2010 सालचा असून, एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत कपिल सिब्बल म्हणतात, राजकारणी न्यायाधीशांचे भवितव्य ठरवू लागले तर ती बाब देशासाठी सर्वात मोठे नुकसानकारक असेल." सिब्बल त्यावेळी काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळी कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश सौमित्र सेन यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला होता. सेन यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे आरोप झाले होते. हा प्रस्ताव राज्यसभेत पारितही झाला होता. मात्र लोकसभेमध्ये हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. जर लोकसभेमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर सौमित्र सेन हे महाभियोग होऊन पदावरून हटवण्यात आलेलेल पहिले न्यायधीश ठरले असते. दरम्यान, काँग्रेसने सात पक्षांच्या 64 खासदारांच्या सह्या असलेला सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नुकताच फेटाळला आहे. दरम्यान, हा महाभियोग प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर कपिल सिब्बल यांनी उपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे म्हटले होते. 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेसDeepak Mishraदीपक मिश्रा