शुभांशू शुक्ला मुलांना म्हणाला, तुम्हीही होऊ शकता अंतराळवीर; कठोर परिश्रम करा, आत्मविश्वास महत्त्वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 06:27 IST2025-07-09T06:27:08+5:302025-07-09T06:27:48+5:30

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शुभांशूने अनेक प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. या संवादासाठी ही शाळकरी मुले शिलाँग येथील अंतराळ अनुप्रयोग केंद्रावर एकत्र आली होती.

Shubanshu Shukla told the children, you too can become an astronaut; work hard, confidence is important! | शुभांशू शुक्ला मुलांना म्हणाला, तुम्हीही होऊ शकता अंतराळवीर; कठोर परिश्रम करा, आत्मविश्वास महत्त्वाचा!

शुभांशू शुक्ला मुलांना म्हणाला, तुम्हीही होऊ शकता अंतराळवीर; कठोर परिश्रम करा, आत्मविश्वास महत्त्वाचा!

नवी दिल्ली :  ‘तुम्हीही भविष्यात अंतराळवीर होऊ शकता, चंद्राची सफरही करू शकता’... १२ दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेला भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला याने शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ही प्रेरणा दिली.

‘मी परत येईन आणि तुम्हाला मार्गदर्शन करेन. भविष्यात आपल्यापैकी अनेक जण अंतराळवीर होऊ शकतात. जिज्ञासू राहा, कठोर परिश्रम करा आणि आत्मविश्वास बाळगा. तुमच्यापैकी अनेक जण चंद्रावरही जाऊ शकतात’, अशा शब्दांत शुभांशूने विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील करिअरबाबत प्रेरणा दिली.
मेघालय आणि आसाममधील सात शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शुभांशूने अनेक प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. या संवादासाठी ही शाळकरी मुले शिलाँग येथील अंतराळ अनुप्रयोग केंद्रावर एकत्र आली होती.

हॅम रेडिओने संपर्क
विद्यार्थ्यांनी शुभांशूला हॅम रेडिओच्या माध्यमातून संवाद साधताना एकूण २० प्रश्न पाठवले होते. १० मिनिटांच्या या संवादात प्रशिक्षणाची माहिती शुभांशूने विद्यार्थ्यांना दिली.

Web Title: Shubanshu Shukla told the children, you too can become an astronaut; work hard, confidence is important!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.