श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर हल्ला, चकमकीत तीन दहशतवादी ठार, एक जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 08:56 IST2020-08-30T08:55:49+5:302020-08-30T08:56:31+5:30
अधिका-यांच्या म्हणण्यानुसार एन्काऊंटर संपला आहे. तिन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर हल्ला, चकमकीत तीन दहशतवादी ठार, एक जवान शहीद
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये 29-30 ऑगस्टला रात्री उशिरा दहशतवाद्यांनी स्थानिक पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गस्ती पथकावर हल्ला केला. यानंतर सुरू झालेल्या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मू-काश्मीर पोलिसांचे सहाय्यक उपनिरीक्षकही चकमकीत शहीद झाले.
श्रीनगर जिल्ह्यातील पंथ चौक भागात ही चकमक झाली. यासंदर्भात एका पोलीस अधिका-याने सांगितले की, खात्मा करण्यात आलेल्या अतिरेक्यांचे मृतदेह सापडले आहेत. ठार झालेल्या अतिरेक्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार एन्काऊंटर संपला आहे. तिन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
Jammu and Kashmir: Three terrorists gunned down by security forces in an encounter that began at Pantha Chowk in Srinagar last night. One police personnel lost his life. Operation is still underway. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/NcEdHr7YnB
— ANI (@ANI) August 30, 2020
29-30 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर तीन दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. हे दहशतवादी दुचाकीवरून आले होते. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी सैन्याने दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम उघडली आहे. राज्यातील काही भागातून दररोज चकमकीचे अहवाल येत आहेत. गेल्या दोन दिवसांतील चकमकीची ही तिसरी घटना आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातही सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी आधी 28 तारखेला आणि नंतर 29 ऑगस्ट रोजी चकमकी झाल्यात.