शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

अयोध्येत 'श्रीराम' तर साऊथमध्ये 'मुरुगन'! लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी DMK चा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 17:08 IST

Lord Murugan Festival: 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष अयोध्येत उभ्या राहिलेल्या प्रभू रामचंद्रांच्या भव्य दिव्य मंदिराला मुद्दा बनवून, तो व्यक्ती व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. याचा परिणाम अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत दिसत आहे. मात्र, तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष असलेल्या द्रमुकनेही (डीएमके) यावर तोडगा शोधून काढण्यास सुरुवात केली आहे. आता तामिळनाडू सरकार भगवान मुरुगन यांच्या आश्रयाला गेले असून भगवान मुरुगन यांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय सम्मेलनाचे आयोजन करणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या आंतरराष्ट्रीय सम्मेलनाचे आयोजन जून अथवा जुलै महिन्यात केले जाणार आहे. या सम्मेलनात भगवान मुरुगन यांच्यावर प्रदर्शन आणि रिसर्च पेपर सादर केले जातील, असे हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडोमेंट्स मंत्री पीके शेखरबाबू यांनी सांगितले तामिळनाडूमध्ये राजकीय पक्षांचा भगवान मुरुगनयांच्याकडील कल नवी गोष्ट नाही. भाजपने 2020 मध्ये 'वेल यात्रा' आयोजित केली होती, तेव्हा एल मुरुगन हे तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते.

डीएमके पहिल्यांदाच भगवान मुरुगन यांना शरण -तामिळनाडूमध्ये 'मंदिर पॉलिटिक्स' सुरू झाले आहे. महत्वाचे म्हणजे, डीएमके हा नास्तिक विचारधारा असलेला पक्ष मानला जातो. पण, पक्षातील नेत्यांना मंदिर अथवा मशिदीत जाण्यापासून रोखले जात नाही. मात्र, मुख्यमंत्री एमके स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके सरकार पहिल्यांदाच भगवान मुरुगन यांच्या आश्रयाला जाताना दिसत आहे. हिंदुत्वाच्या रथावर स्वार भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी डीएमकेची ही खेली असल्याचे मानले जात आहे. त्यांना आशा आहे की, याचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो.

भाजपची प्रतिक्रिया? -डीएमकेच्या या निर्णयावर भाजपने टीका केली आहे. भाजपचे राज्य सचिव आर श्रीनिवासन म्हणाले, 'सर्व प्रथम त्यांनी (डीएमके) केंद्र सरकारच्या योजनांची कॉपी केली आणि त्यावर त्यांच्या नावाचे स्टिकर्स लावले आहे. आता ते आमच्या विचारधारेची आणि राजकारणाची नक्कल करत आहेत. भगवान मुरुगन यांना केवळ तामिळनाडूपर्यंतच मर्यादित ठेवले जाऊ शकत नाही. कारण त्यांची पूजा संपूर्ण देशात केली जाते. लोक अशा प्रकारच्या चालीत अडकणार नाहीत."

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabhaलोकसभाTamilnaduतामिळनाडूPoliticsराजकारणBJPभाजपाDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागम