श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम
By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:25+5:302015-02-08T00:19:25+5:30
लातूर : श्री संत शिरोमणी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त जुना औसा रोडवरील सिद्धेश्वर सोसायटी सभागृहात छत्रपती जनसेवा सांस्कृतिक मंचच्या वतीने दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम
ल तूर : श्री संत शिरोमणी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त जुना औसा रोडवरील सिद्धेश्वर सोसायटी सभागृहात छत्रपती जनसेवा सांस्कृतिक मंचच्या वतीने दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली अष्टेकर देव यांचे १० फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता प्रवचन होईल. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता ह.भ.प. नागनाथराव साठे महाराज यांच्या हस्ते कलश पूजन व रात्री ८ वाजता जालना येथील आनंदे महाराजांचे कीर्तन होईल. ११ फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराजांची आरती होईल. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.