शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्यांना ‘शो-कॉज’

By admin | Updated: February 15, 2017 20:47 IST

आरओंची कारवाई

अमरावती : २१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांना शो-कॉज बजावण्यात आली आहे. मतदानप्रक्रिया आणि ईव्हीएमबाबत ९ फेब्रुवारीला झोननिहाय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. सांस्कृतिक भवनामध्ये महापालिकेच्यावतीने हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.९ फेब्रुवारीला सकाळी ८ ते १२ या कालावधीत झोन क्रमांक १ व २ आणि दुपारी १२ ते ५ या कालावधीत झोन क्रमांक ३ आणि ४ मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले. याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना आगाऊ सूचना देण्यात आली होती. मात्र, या प्रशिक्षणाला हमालपुरा झोन क्रमांक ४ मधील २१ अधिकारी कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. विशेष म्हणजे याप्रशिक्षणात मतदानप्रक्रिया आणि इव्हीएम, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट याबाबत सूक्ष्म माहिती देण्यात आली. महापालिका क्षेत्रातील ८७ जागांसाठी ७३५ मतदान केंद्रांवरुन होत असलेल्या यानिवडणूक प्रक्रियेची व्यापकता लक्षात घेऊन प्रशिक्षण शिबिराला महत्त्व होते. यामहत्त्वपूर्ण प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणाऱ्या ५ केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्र-१ चे ८, क्र, २ चे ३ आणि मतदान अधिकारी क्रमांक ३ चे ५ अशा एकूण २१ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यात. हमालपुरा झोनचे निवडणूक अधिकारी मावळे यांनी या नोटीस बजावल्यात. (प्रतिनिधी)९ फेब्रुवारीला दुपारच्या सत्रात झोन चारमधील निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण होते. याप्रशिक्षणाला अनुपस्थित राहणाऱ्या २१ केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या.- सुनील पकडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्र. २