शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला त्याची जागा दाखवू, दिल्लीच्या सत्तेतून उखडून टाकू, राहुल गांधींची गर्जना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 17:27 IST

2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष भाजपाला जागा दाखवेल, भाजपाला देशाच्या सत्तेतून उखडून टाकेल, अशी गर्जना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

ठळक मुद्दे2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष भाजपाला जागा दाखवेल, भाजपाला देशाच्या सत्तेतून उखडून टाकेल, अशी गर्जना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली भाजपाने आपल्या सत्ता काळात न्यायव्यवस्था, लष्कर आणि प्रसारमाध्यमे अशा संस्थांची विश्वसनीयता कमी केली आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केलासध्या केंद्रात सत्तेवर असलेले भाजपा सरकार बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यास प्रसारमाध्यमांना मज्जाव करत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला

चंदिगड/मोहाली -  2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष भाजपाला जागा दाखवेल, भाजपाला देशाच्या सत्तेतून उखडून टाकेल, अशी गर्जना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. भाजपाने आपल्या सत्ता काळात न्यायव्यवस्था, लष्कर आणि प्रसारमाध्यमे अशा संस्थांची विश्वसनीयता कमी केली आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.  सोमवारी मोहाली येथील एका कार्यक्रमात सहभागी झालेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, आम्ही भाजपाला त्याची जागा दाखवू तसेच त्यांना निवडणुकीत पराभूत करू. 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचा पराभव कसा करता येईल हे आम्ही निश्चित करू,'' यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. भाजपा आणि नरेंद्र मोदींनी देशात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भाजपा आणि मोदींनी प्रसारमाध्यमांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला आहे. असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  आम्हाला काम करू दिले जात नसल्याचे खुलेपणाने सांगत आहेत. तर मोदी लष्कराचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप लष्कराचे जनरल करत आहेत. तसेच निवडणूक आयोगावरही दबाव आणला जात आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.  आम्ही लोकशाहीच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या संस्थाच्या रक्षणासाठी आम्ही लढत राहू.आम्ही आरएसएस आणि भाजपासारखे नाही आहोत. सध्या केंद्रात सत्तेवर असलेले भाजपा सरकार बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यास प्रसारमाध्यमांना मज्जाव करत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी