Shotgun Shatrughan Sinha praise modi for his 15th aug speech | शाॅटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं चक्क माेदींंचे काैतुक
शाॅटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं चक्क माेदींंचे काैतुक

बिहार : माेदींवर सातत्याने टीका करणारे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी माेदींचे ट्विटरवर काैतुक केले आहे. माेदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणाचे त्यांनी काैतुक केले आहे. माेदींचे भाषण हे साहसिक आणि विचार करण्यास लावणारे हाेते असे ट्विट सिन्हा यांनी केले आहे. 

भाजपातून काॅंग्रेसमध्ये आलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेकदा माेदींवर टीका केली आहे. काॅंग्रेसच्या तिकीटावर पटना मधून त्यांनी लाेकसभेची निवडणुक देखील लढवली हाेती. त्यात त्यांचा पराभव झाला हाेता. माेदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणाची शत्रुघ्न सिन्हा यांनी काैतुक केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहीले आहे की, मी नेहमीच माझ्या वक्तव्यासाठी प्रसिद्ध किंवा कुख्यात राहिलाे आहे. परंतु मी इथे सांगू इच्छिताे की पंतप्रधान नरेंद्र माेदी तुमचे 15 ऑगस्टचे लाल किल्ल्यावरील भाषण हे अत्यंत साहसी, संशाेधनात्मक तसेच विचार करण्यास प्रवृत्त करणारे हाेते. तुम्ही याेग्य पद्धतीने भारतातील प्रश्नांवर भाष्य केले आहे. 

या आधी काॅंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी देखील माेदीच्या भाषणाचे काैतुक केले हाेते. आम्ही पंतप्रधानांनी केलेल्या तीन घाेषणांचे स्वागत करताे असे चिदंबरम म्हणाले हाेते. 


Web Title: Shotgun Shatrughan Sinha praise modi for his 15th aug speech
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.