छोट्या बातम्या

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:42+5:302015-03-14T23:45:42+5:30

मालधक्का खड्डेमय

Short News | छोट्या बातम्या

छोट्या बातम्या

लधक्का खड्डेमय
औरंगाबाद : रेल्वेस्थानक परिसरातील मालधक्क्याच्या आवारात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अशा खड्डेमय मार्गातून ये-जा करावी लागत असल्याने ट्रकचालक त्रस्त होत आहेत. मालधक्का परिसरातील खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी केली जात आहे.

टँकरच्या फेर्‍यांवर लक्ष
औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरात १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून दिवसभरात परिसरातील विहिरीत पाणी टाकणार्‍या टँकरद्वारे चार, तर अन्य टँकरच्या तीन फेर्‍या करणे गरजेचे आहे. त्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून पाणी भरण्याचा पॉइंट व वितरण होणारा भाग या दोन्ही ठिकाणी रजिस्टरमध्ये नोंद केली जात आहे.

रस्ता लवकर करा
औरंगाबाद : देवळाई चौक ते देवळाई गाव रस्त्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. रस्त्याचे काम काहीसे संथगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे होणारी गैरसोय पाहता रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

बससाठी प्रतीक्षा
औरंगाबाद : रेल्वेस्थानकावर बर्‍याच वेळ प्रतीक्षा करूनही शहर बस येत नसल्याच्या अनुभवाला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. शनिवारी सकाळी असेच काहीसे चित्र दिसून आले. बस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना नाइलाजाने रिक्षाने जावे लागत आहे.

Web Title: Short News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.