शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात नागपूर

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

अल्प व्याजदराने निधी उपलब्ध करण्याची मागणी

अल्प व्याजदराने निधी उपलब्ध करण्याची मागणी
नागपूर : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड मुंबईतर्फे राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या सभासदांना घरे बांधण्यासाठी मालमत्तेच्या तारणावर दीर्घमुदतीचा कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था आहे. संस्थेचे उपवर्गीकरण वित्तीय संस्था असे असून संपूर्ण राज्यात कार्यक्षेत्र आहे. अलीकडच्या काळात गृहनिर्माण संस्थांना घरबांधणीसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या अनेक संस्था, बँका पुढे आल्याने त्याचा कार्पोरेशनच्या व्यवहारावर परिणाम झाला. संस्थेला अल्प दराने कर्जाची गरज आहे. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गायगोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन अर्थसाह्य करण्याची मागणी केली. त्यावर गडकरींनी अल्प व्याज दराने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी मुकुंद पन्नासे, धनंजय मोहोकर, संदीप जळगावकर, मनोज शिंदे, त्र्यंबक खरबीकर उपस्थित होते.

ग्रीन होपच्या विशेषांकाचे प्रकाशन
नागपूर : रत्ना कम्युनिकेशनच्या वतीने पर्यावरणाशी निगडित ग्रीन होप हे मासिक प्रकाशित करण्यात येते. या मासिकाद्वारे पर्यावरण जागृती, निसर्ग संरक्षण, संवर्धनाचे कार्य अविरत घडत आहे. ग्रीन होप मासिकाला नोव्हेंबर २०१४ मध्ये १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विशेषांकाचे प्रकाशन केले. यावेळी मासिकाचे संपादक डॉ. गिरीश गांधी, ॲड निशांत गांधी, नितीन जतकर, नरेश माहेश्वरी, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, कमलेश राठी, धनंजय मांडवकर, अनिल गडेकर, रामचंद्र गायनेर उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा
नागपूर : आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळ हिंगणाच्यावतीने ज्येष्ठ नागरिक अध्ययन समितीच्या सहकार्याने वानाडोंगरी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष रत्नाकर राऊत होते. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथे ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले. माजी खासदार दत्ता मेघे, आमदार समीर मेघे यांनी ही व्यवस्था करण्याचे सुचविले आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष लिलाधर बेंद्रे उपस्थित होते.