थोडक्यात नागपूर
By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:04+5:302014-12-25T22:41:04+5:30
अल्प व्याजदराने निधी उपलब्ध करण्याची मागणी

थोडक्यात नागपूर
अ ्प व्याजदराने निधी उपलब्ध करण्याची मागणीनागपूर : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड मुंबईतर्फे राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या सभासदांना घरे बांधण्यासाठी मालमत्तेच्या तारणावर दीर्घमुदतीचा कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था आहे. संस्थेचे उपवर्गीकरण वित्तीय संस्था असे असून संपूर्ण राज्यात कार्यक्षेत्र आहे. अलीकडच्या काळात गृहनिर्माण संस्थांना घरबांधणीसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या अनेक संस्था, बँका पुढे आल्याने त्याचा कार्पोरेशनच्या व्यवहारावर परिणाम झाला. संस्थेला अल्प दराने कर्जाची गरज आहे. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गायगोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन अर्थसाह्य करण्याची मागणी केली. त्यावर गडकरींनी अल्प व्याज दराने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी मुकुंद पन्नासे, धनंजय मोहोकर, संदीप जळगावकर, मनोज शिंदे, त्र्यंबक खरबीकर उपस्थित होते.ग्रीन होपच्या विशेषांकाचे प्रकाशननागपूर : रत्ना कम्युनिकेशनच्या वतीने पर्यावरणाशी निगडित ग्रीन होप हे मासिक प्रकाशित करण्यात येते. या मासिकाद्वारे पर्यावरण जागृती, निसर्ग संरक्षण, संवर्धनाचे कार्य अविरत घडत आहे. ग्रीन होप मासिकाला नोव्हेंबर २०१४ मध्ये १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विशेषांकाचे प्रकाशन केले. यावेळी मासिकाचे संपादक डॉ. गिरीश गांधी, ॲड निशांत गांधी, नितीन जतकर, नरेश माहेश्वरी, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, कमलेश राठी, धनंजय मांडवकर, अनिल गडेकर, रामचंद्र गायनेर उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य सुविधानागपूर : आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळ हिंगणाच्यावतीने ज्येष्ठ नागरिक अध्ययन समितीच्या सहकार्याने वानाडोंगरी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष रत्नाकर राऊत होते. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथे ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले. माजी खासदार दत्ता मेघे, आमदार समीर मेघे यांनी ही व्यवस्था करण्याचे सुचविले आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष लिलाधर बेंद्रे उपस्थित होते.