थोडक्यात नागपूर

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:18+5:302015-02-11T00:33:18+5:30

आयुर्वेद महाविद्यालयात व्याख्यानमाला

In short, Nagpur | थोडक्यात नागपूर

थोडक्यात नागपूर

ुर्वेद महाविद्यालयात व्याख्यानमाला
नागपूर : संस्कृत संहिता विभाग, आयुर्वेद महाविद्यालय येथे आयुर्वेद वाचस्पती वैद्य पं. गुलराज शर्मा मिश्र स्मृती व्याख्यानमालेत जीवा आयुर्वेदचे संचालक डॉ. प्रताप चव्हाण यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ते म्हणाले, प्रत्येक घरात आयुर्वेद पोहोचण्याची आज गरज निर्माण झाली आहे. पूर्वी घरातील मोठ्या व्यक्तींना आयुर्वेदिक औषधांचे ज्ञान होते. त्यामुळे आरोग्य राखण्यासाठी त्याचा लोकांना लाभ व्हायचा. पण सध्या आयुर्वेदाची माहितीच लोकांना नसल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. वैद्य मदनगोपाल बाजपेयी यांनी विविध शास्त्रीय उदाहरणांनी आयुर्वेदाचे कौशल्य विकसित करण्याच्या सूत्रांची माहिती दिली. कार्यक्रमाला प्रो. ब्रजेश मिश्रा, संस्था सचिव डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय, डॉ. गायत्री व्यास, डॉ. मृत्युंजय शर्मा, डॉ. मनीषा कोठेकर, डॉ. रामकृष्ण छांगाणी, डॉ. संतोष शर्मा, गिरधर ठाकरे, गीता बावीस्कर, प्रिया भगत, भरत चौरागडे, भावना भलमे, माया कांबळे, रमन बेलगे, प्रमोद गर्जे, देवयानी ठोकळ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
----------------
झाडे कुणबी समाज
नागपूर : झाडे कुणबी समाज संघटनेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही समाज बांधवाचे स्नेहसंमेलन आणि उपवधुवर परिचय मेळावा सेंट पॉल ज्युनिअर कॉलेज, हुडकेश्वर रोड येथे आयोजित करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. झाडे समाजाच्या कुणबी समाजाच्या भूखंडावर संत तुकाराम महाराज स्कील डेव्हलपमेन्ट योजना उभारू, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. मी कुणबी समाजाचा जावई आहे त्यामुळे हे ऋण मला फेडायचे आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी झाडे कुणबी समाज मंदिरासाठी ५० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. कार्यक्रमाला खा. नाना पटोले प्रामुख्याने उपस्थित होते. ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी विशेष मंत्रालय स्थापन करण्यासाठी संसदेत बील आणण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आ. सुधाकर कोहळे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी गोपाल बेहरे, विनोद पटोले, अजय बोढारे, किशोर हेमणे, राजाभाऊ ताकसांडे, ॲड. गोविंद भेंडारकर, भगवान मेंढे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: In short, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.