दिल्लीत गोळीबार; दोन जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 02:28 IST2020-06-24T02:27:55+5:302020-06-24T02:28:00+5:30

फैजान अली याचा मुलगा शदियाब अली याने मोहसीनवर गोळीबार केला होता. शादियाब आणि त्याचा एक मित्र सैफ याला अटक करण्यात आली आहे. आणखी एक आरोपी फरार आहे.

Shooting in Delhi; Two arrested | दिल्लीत गोळीबार; दोन जण अटकेत

दिल्लीत गोळीबार; दोन जण अटकेत

नवी दिल्ली : आग्नेय दिल्लीतील शाहीनबाग परिसरातील अबुल फजल एन्क्लेव्हच्या नव्या वसाहतीत किरकोळ वादावरून झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
घरमालक फैजान अली आणि त्याचा भाडेकरू मोहसीन यांच्यात भाडे देण्यावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. यावरून फैजान अली याचा मुलगा शदियाब अली याने मोहसीनवर गोळीबार केला होता. शादियाब आणि त्याचा एक मित्र सैफ याला अटक करण्यात आली आहे. आणखी एक आरोपी फरार आहे.
पोलिसांनी सांगितले की, मोहसीन याच्याकडे तीन-चार महिन्यांपासूनचे भाडे थकले होते. भाडे दे किंवा फ्लॅट रिकामा कर, असे मालकाचे म्हणणे होते. त्यावरून रविवारी त्यांच्यात वाद झाला होता. मोहसीन यास होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोपी शादियाब हा हॉटेल मॅनेजमेंटचा पदवीधर असून, त्याची काहीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.

Web Title: Shooting in Delhi; Two arrested