शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:41 IST

गेल्या तीन वर्षांत २०हून अधिक तरुणांशी बनावट विवाह करून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे लंपास केल्याची धक्कादायक कबुली टोळीतील महिलांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. खुलदाबाद पोलिसांनी शनिवारी एका फसवणूक करणाऱ्या 'वधू टोळी'ला अटक केली असून, या टोळीत चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांत २०हून अधिक तरुणांशी बनावट विवाह करून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे लंपास केल्याची धक्कादायक कबुली टोळीतील महिलांनी दिली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूकपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचा प्रमुख उद्देश असा होता की, ते लग्नाची इच्छा असलेल्या आणि विवाह न झालेल्या तरुणांना हेरत. बनावट नातेवाईक, खोटे कागदपत्र आणि नकली घर दाखवून, हे लोक वराच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करत. त्यानंतर नकली विवाह केला जाई आणि विवाहाच्या काही दिवसांतच वधू घरातील सगळ्या मौल्यवान वस्तूंसह गायब होत असे.

राजस्थानपासून प्रयागराजपर्यंतचा फसवणुकीचा प्रवासया टोळीविरोधात कारवाईची सुरुवात राजस्थानमधील अलवर येथील गोपाल गुर्जर यांच्या तक्रारीनंतर झाली. त्यांनी खुलदाबाद पोलीस ठाण्यात तक्रार केली की, त्यांच्या मुलाची लग्नाच्या नावाखाली १.७५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, पोलिसांनी शहाना (करेली), निशा कुमारी आणि प्रीती देवी (पिपलगाव), ममता भारतीय (झुंसी), आसिफ आणि मोहम्मद जैनुल (शाहगंज), आणि श्रीराम गुर्जर (अलवर, राजस्थान) या सात जणांना अटक केली.

टोळीच्या कारभाराची पद्धत काय?या 'वधू टोळी'ची कार्यपद्धती विशेष होती. एक सदस्य लग्न इच्छुक तरुणांची माहिती गोळा करायचा, ती माहिती टोळीपर्यंत पोहोचवली जायची. नंतर, टोळीतील महिला वधू म्हणून सादर केल्या जायच्या. त्यांचे नातेवाईक म्हणून टोळीचेच पुरुष सदस्य सहभागी व्हायचे. लग्नानंतर वधू संधी मिळताच पैसे, दागिने घेऊन घरातून पळून जायची.

काही प्रसंगी, वधू ट्रेनने सासरी जात असताना मध्येच उतरून पळून जात असे, तर काही वेळा सासरी पोहोचल्यावर मध्यरात्रीची वेळ साधून गायब होत असे. एवढेच नव्हे तर, वधू परत आली नाही तर तक्रार करणाऱ्यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जायची. 

काय जप्त केलं गेलं?पोलिसांनी टोळीकडून सहा बनावट आधार कार्ड आणि ३५,००० रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. चौकशीत आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यता असून तपास अधिक खोलवर चालू आहे. पोलिसांच्या तपासानुसार, ही टोळी केवळ प्रयागराज नव्हे तर इतर जिल्ह्यांमध्येही सक्रिय होती. त्यांचा नेटवर्क मजबूत असून, पांढरपेशा वर्तुळातील काहीजणही यामध्ये सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश