शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

#SHOCKING : पुरुष असल्याचा बनाव करत तीन अल्पवयीन मुलींशी लग्न करणाऱ्या तरुणीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 12:15 IST

ही स्त्री गेले इतकी वर्ष पुरुष असल्याचा बनाव रचत होती. मात्र तिच्या पत्नींसहीत इतर कोणालाही याविषयी काहीच कल्पना आली नाही.

ठळक मुद्दे एका तरुणीनं चक्क पुरुष असल्याचं नाटक करत तीन मुलींशी लग्न केल्याची घटना उघड झाली आहे.या तरुणीनं याधीच दोन मुलींशी लग्न केल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नाही. मात्र जेव्हा तिसऱ्या पत्नीला आपण पुरुषाशी नाही तर स्त्रीशी लग्न केल्याचं समजलं तेव्हा या फसव्या तरुणीचं बिंग फुटलं. 

अनंतपूर :  अनंतपूर जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. एका तरुणीनं चक्क पुरुष असल्याचं नाटक करत तीन मुलींशी लग्न केलं. या तरुणीनं याधीच दोन मुलींशी लग्न केल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नाही. मात्र जेव्हा तिसऱ्या पत्नीला आपण पुरुषाशी नाही तर स्त्रीशी लग्न केल्याचं समजलं तेव्हा या फसव्या तरुणीचं बिंग फुटलं. 

डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, बी. रामदेवी असं या तरुणीचं नाव आहे. तामिळनाडूतील एका गिरणीत ही तरुणी काम करते. या गिरणीत काम करणाऱ्या एका १७ वर्षाच्या युवतीशी तिची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रामदेवीचे पोषाख पुरुषांसारखे असायचे. एवढंच नव्हे तर तिचं वागणं-बोलणंही तसंच होतं. त्यामुळे तिच्यावर कोणीच संशय घेतला नाही. दरम्यान, त्या १७ वर्षीय युवतीचं रामदेवीशी लग्न झालं. लग्नानंतर दोन महिन्यांनतर त्या अल्पवयीन युवतीला समजलं की आपण तिचा नवरा पुरुष नसून स्त्री आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिनं हा सगळा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. तिच्या आई-वडिलांनी त्वरीत रामदेवीविरोधात कडपा जिल्ह्यातील पोलिसात तक्रार दाखल केली. 

आणखी वाचा - ती म्हणतेय हा माझा पती, तो म्हणतोय ही उचापती...; दोघांच्या एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी

पोलिसांनी या रामदेवीची सखोल चौकशी केली असता तिची याआधी दोन अल्पवयीन मुलींशी लग्न झाल्याचं उघड झालं. या दोन मुली कडपा आणि अनंतपुरा या जिल्ह्यातील राहणाऱ्या होत्या. त्या मुलींचीही चौकशी केली तेव्हा असं समजलं की या दोघींचीही मानसिक अवस्था बिघडलेली आहे. लग्नानंतरच या दोघींना मानसिक आजार जडल्याचंही सांगण्यात आलंय. पुरुष असल्याची बतावणी करणाऱ्या या रमादेवीवर काय कारवाई होतेय हे पाहणंच उत्सुकतेचं ठरेल. दरम्यान आपल्याकडे अद्यापही समलैंगिक लग्नांना मान्यता नसल्यानं तिनं फसवून लग्न केलं असण्याची शक्यता आहे, असं बोललं जात आहे. 

आणखी वाचा - घृणास्पद ! 81 महिलांवर बलात्कार करुन सीरिअल किलरनं केली हत्या 

 

टॅग्स :Crimeगुन्हाIndiaभारतLGBTएलजीबीटी