शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बिस्किटचा पुडा चोरल्यानं विद्यार्थ्यांनी त्याला मारला अन् शाळेनं मृतदेह पुरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 15:57 IST

उत्तराखंडमधील एका निवासी शाळेमध्ये वरिष्ठ विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याचा क्रिकेटच्या बॅटने बेरहमीने मारहाण करत खून केल्याची घटना घडली आहे.

डेहरादून : उत्तराखंडमधील एका निवासी शाळेमध्ये वरिष्ठ विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याचा क्रिकेटच्या बॅटने बेरहमीने मारहाण करत खून केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे शाळेने मृत विद्यार्थ्याच्या पालकांना न सांगताच या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या आवारात पुरून टाकला. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणावर प्रकाश पडला आहे.

 पोलिसांनी सांगितले की, ही घटना 10 मार्चची आहे. मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. उत्तराखंड कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्सच्या डेहरादूनच्या एएसपी निवेदिता कुकरेती यांनी सांगितले की, 12 वर्षाच्या या मृत विद्यार्थ्याचे पालक उत्तर प्रदेशमधील हापुडमध्ये राहतात. त्याला त्याच्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रिकेटच्या बॅटने मारहाण करत ठार केले. 

खरेतर मृत विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या शेजारील एका दुकानातून बिस्किटचा पुडा चोरला होता. याची तक्रार या दुकानदाराने शाळेकडे केली होती. यामुळे शाळा प्रशासनाने हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना विना परवानगी बाहेर जाण्यावर बंदी घातली होती. यामुळे त्याच्या वरच्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत होता. या रागातून या विद्यार्थ्यांनी त्याला जवळपास 1 तास मारहाण केली. जेव्हा याची माहिती शाळेला समजली तेव्हा त्यांनी या विद्यार्थ्याला मुर्च्छित अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सर्वात धक्कादाक म्हणजे शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थी मृत झाल्याचे त्याच्या पालकांना कळवायला हवे होते. मात्र, त्यांनी पोलिसांनाही याबाबत काहीच कल्पना न देता मृतदेहाची विल्हेवाट लावली. शाळेने हे खून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला व मृतदेह पुरला. पोलिसांनी या प्रकरणी दोन विद्यार्थ्यांसह पाच जणांना अटक केली आहे. 

पोलिसांनी शाळेच्या आवारातून विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तसेच शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी