धक्कादायक! 'त्या'नं ठेवले 140 महिलांबरोबर शरीर संबंध

By Admin | Updated: July 26, 2016 19:52 IST2016-07-26T19:51:42+5:302016-07-26T19:52:05+5:30

उत्तर प्रदेशमधल्या बरेली जिल्ह्यात एका व्यक्तीनं एक दोन नव्हे तर तब्बल 140 महिलांसोबत शरीर संबंध प्रस्थापित केल्याची माहिती समोर आली आहे.

Shocking She put her 140 body relations with women | धक्कादायक! 'त्या'नं ठेवले 140 महिलांबरोबर शरीर संबंध

धक्कादायक! 'त्या'नं ठेवले 140 महिलांबरोबर शरीर संबंध

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 26 - उत्तर प्रदेशमधल्या बरेली जिल्ह्यात एका व्यक्तीनं एक दोन नव्हे तर तब्बल 140 महिलांसोबत शरीर संबंध प्रस्थापित केल्याची माहिती समोर आली आहे. शरीर संबंध ठेवलेल्यांमध्ये एका महिला पोलीस अधिका-याचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे ही धक्कादायक माहिती दुसरं तिसरं कोणी नाही तर त्याच्या अल्पवयीन मुलीनेच दिली आहे. या मुलीच्या माहितीनुसार वडिलांनी एका डायरीमध्ये शरीर संबंध प्रस्थापित केलेल्या महिलांच्या नावासकट माहिती लिहिली आहे.
वडिलांनी एक डायरी ट्रंकात लपवून ठेवली होती. त्या डायरीमध्ये महिलांशी कधी आणि कुठे भेट झाली. कोणाशी कितीदा शरीर संबंध ठेवले याबाबतची सर्व माहिती ते लिहित होते.

मुलीच्या माहितीनुसार तिच्या वडिलांविरोधात बरेलीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या या वर्तनापायी माझ्या आईनं 14 वर्षांची असतानाच 1997मध्ये माझं लग्न लावून दिलं, असंही त्या मुलीनं सांगितलं आहे. या धक्कादायक माहितीमुळे बरेलीमध्ये ती व्यक्ती चर्चेचा विषय ठरली आहे.

Web Title: Shocking She put her 140 body relations with women