बापरे! माणुसकी आहे की नाही, हॉर्न वाजवण्यास रोखले, संतापून थारने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 16:54 IST2025-05-05T16:53:46+5:302025-05-05T16:54:13+5:30

रविवारी राजधानी दिल्लीत एका थारने सुरक्षा रक्षकाला चिरडल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला.

Shocking Security guard crushed by Thar for stopping him from honking, video goes viral | बापरे! माणुसकी आहे की नाही, हॉर्न वाजवण्यास रोखले, संतापून थारने चिरडले

बापरे! माणुसकी आहे की नाही, हॉर्न वाजवण्यास रोखले, संतापून थारने चिरडले

रविवारी राजधानी दिल्लीत एका थारने सुरक्षा रक्षकाला चिरडल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला. रविवारी महिपालपूर उड्डाणपुलाजवळ एका २४ वर्षीय तरुणाने हॉर्न वाजवण्यास नकार दिल्याने त्याच्या महिंद्रा थार कारने एका सुरक्षा रक्षकाला जाणूनबुजून चिरडले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
 
मिळालेली माहिती अशी, वसंत कुंज पोलिस ठाण्याने सहा तासांच्या आत आरोपीला अटक केली. पीडित राजीव कुमार हा फायरवॉल सिक्युरिटीज लिमिटेडमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्यांनी पोलिसांना सांगितले की, रविवारी दुपारी रस्ता ओलांडत असताना, त्यांनी एका थार चालकाला अनावश्यक हॉर्न वाजवण्यापासून रोखले होते.

रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन

यावर चालक संतापला आणि त्याने जाणूनबुजून त्याच्या थार वाहनाने धडक दिली, यामुळे ते रस्त्यावर कोसळले आणि आरोपीने त्यांच्यावर अंगावरुन कार घातली.

या हल्ल्यात राजीव कुमार यांचे दोन्ही पाय आणि घोट्यांमध्ये फ्रॅक्चर झाले. घटनेची माहिती मिळताच वसंत कुंज दक्षिण पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि हिट अँड रनचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.

घटनेत वापरलेली महिंद्रा थार वाहन जप्त

पोलिसांनी घटनास्थळाभोवतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्याच्या आधारे काळ्या रंगाची महिंद्रा थार ओळखली. गाडी मालकाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रंगपुरी येथील रहिवासी असलेल्या आरोपी विजय उर्फ ​​लाला याला अटक केली आणि त्याची महिंद्रा थार कार जप्त केली.

Web Title: Shocking Security guard crushed by Thar for stopping him from honking, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.