शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : शाळेतील पटसंख्या 37 लाखांनी घटली २०२३-२४साठीचा शिक्षण मंत्रालयाचा डेटा जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:24 IST

युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन (यूडीआयएसई) प्लस हा देशभरातील शालेय शिक्षणाचा डेटा एकत्रित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील डेटा एकत्रीकरण प्लॅटफॉर्म आहे. 

नवी दिल्ली : शिक्षण मंत्रालयाच्या ‘यूडीआयएसई’च्या आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये भारतातील शाळांमधील पटसंख्या मागील वर्षाच्या तुलनेत ३७ लाखांनी कमी झाली आहे.

युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन (यूडीआयएसई) प्लस हा देशभरातील शालेय शिक्षणाचा डेटा एकत्रित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील डेटा एकत्रीकरण प्लॅटफॉर्म आहे. 

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, ओडिशा, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये, उपलब्ध शाळांची टक्केवारी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीपेक्षा जास्त आहे. ज्यामुळे उपलब्ध शाळांचा कमी वापर होतो. 

तेलंगणा, पंजाब, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि बिहार यासारख्या राज्यांमध्ये, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत उपलब्ध शाळांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आहे, असे अहवालात म्हटले आहे.

अहवालात काय?२०२२-२३ मध्ये नोंदणीकृत  विद्यार्थ्यांची संख्या २५.१७ कोटी होती, २०२३-२४ ची आकडेवारी २४.८० कोटी होती.२०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४मध्ये मुलींच्या संख्येत १६ लाखांनी घट झाली आहे, तर मुलांची संख्या २१ लाखांनी कमी झाली आहे. एकूण पटसंख्येत अल्पसंख्याकांचे प्रमाण २० टक्के होते. अल्पसंख्याकांमध्ये ७९.६ टक्के मुस्लीम, १० टक्के ख्रिश्चन, ६.९ टक्के शीख, २.२ टक्के बौद्ध, १.३ टक्के जैन आणि ०.१ टक्के पारशी होते.२०२३-२४ पर्यंत १९.७ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक दिले. एकूण नावनोंदणी गुणोत्तर शिक्षणाच्या विशिष्ट स्तरावरील नावनोंदणीची तुलना वयोगटातील लोकसंख्येशीकरण्यात येते.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी