शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जवानांच्या कुटुंबीयांसाठी वर्षाकाठी मिळतेय अवघ्या 'सव्वा रुपयाची मदत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 11:26 IST

एनडीएफच्या आकडेवारीतून माहिती उघड

- मनिषा म्हात्रे

मुंबई : पुलवामामधल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. सोशल मीडियावर विविध पोस्टद्वारे निषेधाचा सूर उमटत असतानाच, शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या भारत सरकारच्या राष्ट्रीय संरक्षण निधीच्या (नॅशनल डिफेन्स फंड, एनडीएफ) आकडेवारीने लक्ष वेधले. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीनुसार, नागरिकांकडून वर्षाला सरासरी अवघ्या १ रुपये ३३ पैसे जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदत केली जात असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.

गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार, एनडीएफमध्ये वर्षाला सरासरी ८० कोटी रुपये जमा होतात. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात अबालवृद्ध, बेरोजगार, दारिद्र्यरेषेखालील ६५ कोटी नागरिक सोडले तरी उरलेल्या सरासरी ६० कोटी नागरिकांनी जवानांच्या थेट मदतीसाठी फंडातर्फे वर्षाला फक्त एक रुपया तेहतीस पैसे दिल्याचे समोर आले आहे. या फंडातून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाते.

पुलगामामधल्या अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४९ जवानांवर मृत्यू ओढावला. सोशल मीडियावर विविध पोस्ट टाकून श्रद्धांजली अर्पण होत असतानाच, फेसबुकवरून पुण्याचे श्रीरंग चितळे यांनी मदतनिधीवर प्रकाश टाकला. दिवसाला आपले दीडशे ते पाचशे रुपये विनाकारण खर्च होतात. त्यामुळे सव्वाशेपैकी शंभर कोटी जनतेने महिन्याला एक रुपया जरी जमा केला तरी, महिन्याकाठी शंभर कोटी रुपये जमा होतील. वर्षाला हाच आकडा बाराशे कोटींवर जाऊ शकतो. नुकत्याच चर्चेत आलेल्या ‘उरी’ सिनेमाने काही आठवड्यांत २०० हून अधिक कोटींचा गल्ला जमवला. मात्र हीच रक्कम गोळा होण्यासाठी सद्य:स्थितीत एनडीएफला ३ वर्षे लागतात. त्यामुळे यावर विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.संकेतस्थळाची अधिकृतता पडताळून पुढाकार घ्याएनडीएफ फंडातील रक्कम फक्त शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी दिली जाते. अनेकदा अपुरी माहिती तसेच अधिकृतेबाबतच्या भीतीमुळे नागरिक पुढाकार घेत नाहीत. त्यात सध्या पुलवामाच्या हल्ल्यानंतर याबाबत मदतीसाठी विविध संकेतस्थळांची माहिती समोर आली. मात्र, मदत करण्यापूर्वी योग्य संकेतस्थळाचीच निवड करणे गरजेचे आहे. शासनाच्या अधिकृत फंडच्या संकेतस्थळावर आयकराचीही सवलत मिळते.- मेहुल कर्निक, डिफेन्स प्रवक्ता, मुंबईगेल्या पाच वर्षांतील आकडेवारी (रुपये कोटींमध्ये)मिळालेला मदतनिधी८0.९३६५.८८खर्च२०१४

------------------८४.७२३३.९८खर्च२0१५

------------------८३.५३३३.९८खर्च२0१६

-----------------------८२.0२३0.२0खर्च२०१७

-----------------८३.८५६४.७४खर्च२०१८

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSoldierसैनिकfundsनिधीJammu Kashmirजम्मू-काश्मीर