शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! चिन्मयानंदांविरुद्ध बलात्काराचा गुन्हाच नाही, पीडित मुलीवरच खटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 11:01 IST

एसआयटीने चिन्मयानंद यांना अटक करुन त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.

लखनौ - कायदा शाखेच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.  उत्तर प्रदेशपोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) चिन्मयानंद यांना निवासस्थानातून अटक केली. मात्र, याप्रकरणी चिन्मयानंद यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हाच दाखल करण्यात आला नाही. 

एसआयटीने चिन्मयानंद यांना अटक करुन त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यांच्या वकील पूजा सिंह यांनी सांगितले की, अटकेसंदर्भातील मेमोवर एसआयटीने चिन्मयानंद यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या; परंतु अटकेसंदर्भातील अन्य कोणतीही कागदपत्रे त्यांना देण्यात आली नाहीत. विशेष म्हणजे चिन्मयानंद यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हाच दाखल करण्यात आला नसल्याचे उघडकीस आले आहे. याउलट बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थीनीविरुद्धच 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करुन तिच्या तीन सहकाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यामुळे पीडित मुलीने आश्चर्य व्यक्त केले आहे. तर, चिन्मयानंद यांनी बलात्काराशिवाय इतर सर्व गुन्हे कबुल केल्याचे एसआयटीने म्हटले आहे. 

चिन्मयानंद यांना सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले असता तिथे अन्य कोणालाही काही काळ प्रवेश नाकारल्याने अन्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल झाले. त्यांच्या अटकेमध्ये कोणतीही बाधा येऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांचे निवासस्थान, रुग्णालय, न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. चिन्मयानंद यांच्या संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयात कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने चिन्मयानंद यांनी बलात्कार केल्याचा, तसेच वर्षभर लैंगिक पिळवणूक केल्याचा आरोप केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सुरू होता. चिन्मयानंद तीनदा लोकसभेवर निवडून आले होते. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही होते. 

टॅग्स :Rapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी