धक्कादायक- कॅन्सरग्रस्त 90 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार
By Admin | Updated: September 21, 2016 16:48 IST2016-09-21T16:48:19+5:302016-09-21T16:48:19+5:30
एका 90 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तिने

धक्कादायक- कॅन्सरग्रस्त 90 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार
>ऑनलाइन लोकमत
कोल्लम, दि.21- केरळमध्ये एका 90 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तिने महिलेवर बलात्कार केला. कोल्लम पोलिसांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. पिडीत वृद्ध महिला ही कर्करोगाने ग्रस्त आहे.
पाच दिवसांपूर्वी घडलेली ही घटना बुधवारी उघडकीस आली. पिडीत महिला ही विधवा असून अपत्य नसल्यामुळे ती गेल्या 20 वर्षांपासून एकटी राहते. आरोपीने घराच्या मागच्या दरवाजातून घरात प्रवेश केला. त्यामुळे घराविषयी सर्व माहिती असणा-या व्यक्तिनेच बलात्कार केला असल्याचा संशय महिलेने व्यक्त केला आहे. महिलेला परिसरातील एक व्यक्तीवर संशय असून सदर इसम त्या दिवसानंतर फरार आहे. विशेष म्हणजे घटनेनंतर दुस-या दिवशी महिलेने नातेवाईक आणि शेजा-यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली असता त्यांनी तिला घडल्या प्रकराची वाच्यता न करण्याचा सल्ला दिला होता. आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी महिलेने केली आहे.
कोल्लम ग्रामीण पोलिसांनी याबाबत एफआयआर दाखल केली आहे. पोलीस सध्या महिलेचे नातेवाईक आणि घटनेनंतर तिच्या घरी येऊन गेलेल्या व्यक्तिंची चौकशी करत असून आरोपीचा कसून शोध घेत आहेत.