शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
2
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
3
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
5
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
6
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
7
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
8
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
9
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
10
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
11
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
12
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
13
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
14
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
15
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
16
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
17
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
18
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
19
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
20
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 20:40 IST

Punjab Shocking News: पंजाबमधील मोगा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली.

पंजाबमधील मोगा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली, जिथे एका पतीने आपल्याच पत्नीला ड्रग्जचे व्यसन लावून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर मोगा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पतीला अटक केली. 

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिचे तीन वर्षांपूर्वी गौरव नावाच्या तरुणाशी लग्न झाले. सुरुवातीला त्यांचे वैवाहिक जीवन सामान्य होते. मात्र, लग्नाला दोन वर्षे झाल्यानंतर पती गौरवचा खरा चेहरा उघड झाला. महिलेने पोलिसांना सांगितले की, सुमारे एक वर्षापूर्वी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तिच्या पतीने तिला  ड्रग्जचे व्यसन लावले. ती पूर्णपणे व्यसनाधीन झाल्यानंतर, त्याने तिला ग्राहकांकडे पाठवण्यास सुरुवात केली. आरोपी पती स्वतः क्लायंटशी संपर्क साधत असे आणि कधीकधी तो तिला हॉटेलमध्येही सोडायचा. हा भयानक प्रकार सुमारे वर्षभर सुरू होता.

काही दिवसांपूर्वी ही महिला दारूच्या नशेत रस्त्यावर अचेत अवस्थेत पडलेली आढळली. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी तिला त्वरित रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर महिलेने आपल्या कुटुंबाला तिची संपूर्ण आपबीती सांगितली. संपूर्ण कहाणी ऐकून कुटुंबाला मोठा धक्का बसला आणि त्यांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

आरोपी पतीला अटक

डीएसपी सिटी गुरप्रीत सिंह यांनी सांगितले की, पीडितेच्या गंभीर तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पती गौरवला अटक केली. आरोपीविरुद्ध अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman found unconscious, reveals husband forced her into prostitution.

Web Summary : In Punjab, a woman revealed her husband drugged her and forced her into prostitution. He was arrested after she regained consciousness and told her family, who filed a police complaint. Police are investigating further.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब