शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आईने मुलगा, मुलगीची केली हत्या; पैसे, दागदागिने जाळले, स्टेटस लावला, त्यानंतर…

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 16:13 IST

Crime News: एका महिलेने तिच्या दोन मुलांना टाकीत टाकून ठार मारले. त्यानंतर घरातील दागदागिने आणि पैसे जाळून स्वत:च्या मोबाईलमध्ये मृत्यूचा स्टेटस लावला. त्यानंतर पाण्याच्या टाकीमध्ये उडी मारून जीवन संपवले.

राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने तिच्या  मुलांची हत्या करून नंतर स्वत:ही जीवन संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाडमेरमधील गंगासरा गावामधील एका महिलेने तिच्या दोन मुलांना टाकीत टाकून ठार मारले. त्यानंतर घरातील दागदागिने आणि पैसे जाळून स्वत:च्या मोबाईलमध्ये मृत्यूचा स्टेटस लावला. त्यानंतर पाण्याच्या टाकीमध्ये उडी मारून जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही मृतदेह टाकीमधून बाहेर काढले. त्यानंतर ते मृतदेह शवागारात पाठवण्यात आले.

याबाबत बाडमेरमधील पोलीस अधिकारी किशन सिंह चारुण यांनी सांगितले की, गंगासरा गावात एका महिलेने आपल्या दोन्ही मुलांसह जीवन संपवल्याची खबर आम्हाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिथे पाण्याच्या टाकीमध्ये तीन मृतदेह तरंगत असलेले आढळले. मृतांची ओखळ झीमो देवी, तिचा मुलगा संतोष आणि मुलगी भावना अशी पटली.

याबाबत झीमोदेवी यांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यात मृत झीमोदेवी हिला तिचा पती आणि जाऊबाई सातत्याने त्रास देत होते. त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मृत महिलेने जीवन संपवण्यापूर्वी एक स्टेटस लावलं होतं. त्याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही तिच्या नातेवाईकांनी केली आहे. तसेच रोख रक्कम आणि दागिने जाळण्याच्या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही नातेवाईकांनी केली आहे.

तसेच मृत महिलेचा पती चीमाराम आणि तिच्या जावेकडून तिचा छळ केला जात होता. तसेच चीमाराम आणि तिच्या जावेमध्ये अनैतिक संबंध होते. या संबंधांना विरोध केल्याने तिचा छळ केला जात होता, असा आरोपही मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानFamilyपरिवार