शहरं
Join us  
Trending Stories
1
Narayan Rane : 'मी एका उपशाखा प्रमुखाला ठार मारणार होतो, बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून...'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
2
ट्रंप यांनी जाहीर केली सरकारी मदत घेणाऱ्या देशांची लिस्ट; त्यात भारताचे तीन शेजारी, भारताचे नाव आहे का?
3
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
4
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
5
वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरण्याचा कट! रुळांवर लाकूड ठेवल्याचे आढळले; मोठा अपघात टळला
6
"मला खुश करणं गरजेचं, अन्यथा..."; रशियन तेलावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा टॅरिफचा इशारा
7
बँक कर्मचारी संपावर जाणार, तीन दिवस व्यवहार होणार ठप्प; कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल?
8
धक्कादायक! ट्रंप यांची व्हेनेझुएलावर दुसऱ्या हल्ल्याची धमकी; आता कोलंबियाही रडारवर, दक्षिण अमेरिकेत युद्धाचे ढग?
9
भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
10
आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य!
11
‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
12
मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा
13
“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे
14
“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
15
“वचननामा नव्हे ‘वाचून’नामा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका
16
“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार
17
“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप
18
राज्यातील प्रत्येक बसस्थानक-नगरपालिकेत पुस्तकांचे सवलतीत दुकान; DCM शिंदेंची साहित्य संमेलनात घोषणा
19
ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल
20
बंडखोरी आटोक्यात; मात्र अपक्षांची डोकेदुखी कायम, ठाण्यात १३१ जागांसाठी ८६ अपक्ष रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मोबाईलला रेंज येत नव्हती, इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक १७ व्या मजल्यावरून पडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 12:32 IST

Ajay Garg IOC ED death: नोएडातील सेक्टर-१०४ मध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक अजय गर्ग यांचा १७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही आत्महत्या आहे की अपघात? वाचा सविस्तर बातमी.

नोएडा: उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक अजय गर्ग यांचा सेक्टर-१०४ मधील एका हायराईज सोसायटीच्या १७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, अजय गर्ग हे सेक्टर-१०४ मधील 'एटीएस वन हॅम्लेट' सोसायटीत आपल्या पत्नीसोबत राहत होते. शनिवारी सकाळी १०:२० च्या सुमारास ते घराच्या बाल्कनीमध्ये मोबाईलवर बोलत होते. घरात नेटवर्क येत नसल्यामुळे ते बाल्कनीमध्ये गेले होते, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. फोनवर बोलत असतानाच त्यांचा तोल गेला की त्यांनी उडी मारली, याबाबत अद्याप संभ्रम आहे.

पोलिसांकडून तपास सुरूसोसायटीतील रहिवाशांनी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहताच तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सेक्टर-३९ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

अजय गर्ग हे मूळचे कानपूरचे रहिवासी असून ते दिल्लीतील इंडियन ऑईलच्या कार्यालयात कार्यरत होते. त्यांचा मुलगा मुंबईत नोकरी करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून कोणतीही 'सुसाईड नोट' मिळालेली नाही.

अपघात की आत्महत्या? पोलिस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. "आम्ही सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत आणि कुटुंबातील सदस्यांची चौकशी करत आहोत. हा अपघात आहे की आत्महत्या, हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर आणि सखोल तपासानंतरच स्पष्ट होईल," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Oil executive director falls from 17th floor, dies.

Web Summary : Indian Oil's executive director, Ajay Garg, died after falling from his 17th-floor balcony in Noida. He was reportedly using his phone due to poor network connectivity. Police are investigating whether it was an accident or suicide. No suicide note was found.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश