शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

धक्कादायक! काश्मीरमध्ये पोलिसवालेच दहशतवाद्यांना पुरवत होते शस्त्रास्त्रे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 14:00 IST

जम्मू-काश्मीर पोलीस दलामधील काही पोलीसच दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे संरक्षण दलांमध्ये खळबळ उडाली आहे.

श्रीनगर - ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत दहशतवाद्यांविरोधात जोरदार आघाडी उघडून भारतीय लष्कराने काश्मीरमधील फुटिरतावादी दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र याचदरम्यान जम्मू-काश्मीर पोलीस दलामधील काही पोलीसच दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे संरक्षण दलांमध्ये खळबळ उडाली आहे.एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दहशतवाद्यांना हत्यारे आणि शस्रास्त्रे पुरवत असलेल्या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. तसेच दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या रॅकेटमध्ये पोलीसदलाचे दोन कॉन्स्टेबल असल्याचेही  उघड झाले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील शोपियाँन जिल्ह्यात 9 ऑक्टोबरला दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला अटक केली होती. तसेच त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि एके-47 जप्त केले होते. या कारवाईकडे लष्करासाठी मोठे यश म्हणून पाहिले जात होते. दरम्यान, यानंतरच या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा येथील हाजीन भागात बुधवारी पहाटे सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा पथकांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले पण आपले दोन जवानही शहीद झाले. चकमक संपलेली नसून, ऑपरेशन सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजूनही काही दहशतवादी इथे लपले असण्याची शक्यता आहे. ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तय्यबाचे असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी बारामुल्ला येथील लाडोरा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर खालिद याला कंठस्नान घातले. खालिद हा बीएसएफ कॅम्पवर झालेल्या तळावरील हल्ल्याचा मास्टर माईंड होता. या चकमकीत लष्कराने कुख्यात दहशतवादी खालिद याला एका शाळेमध्ये घेरले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी झालेल्या चकमकीत खालिद जखमी झाला होता. पायाला जखम झाल्याने तो याच परिसरात अडकला होता. अखेर चकमकीत लष्कराने त्याला ठार मारले. खालिद हा पाकिस्तानी नागरिक होता. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा सोमवारी भारत - पाकिस्तान सीमारेषेवर असणारे भारतीय लष्कराचे जवान दिवसाला पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत, असे म्हटले होते. पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्यांना योग्य ते उत्तर द्या, असा आदेश दिला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.

टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू काश्मिरPoliceपोलिसIndian Armyभारतीय जवान