शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

धक्कादायक! केवल २० रुपयांत भारताचं नागरिकत्व, बांगलादेशी घुसखोरांना मिळतंय आधार आणि मतदार कार्ड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 21:27 IST

Delhi Crime News: दिल्ली पोलिसांनी हल्लीच बांगलादेशी घुसखोरांना भारतीय ओळखपत्र मिळवून देणाऱ्या एका मोठ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणी ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी हल्लीच बांगलादेशी घुसखोरांना भारतीय ओळखपत्र मिळवून देणाऱ्या एका मोठ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणी ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यामध्ये पाच बांगलादेशी नागरिक आणि बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या सहा जणांचा समावेश आहे. 

दक्षिण दिल्लीतील संगम विहार येथे झालेल्या एका हत्येचा प्रकरणाचा तपास करत असताना या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. दक्षिण दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी अंकित चौहान यांनी सांगितले की, सेटों शेख नावाच्या एका व्यक्तीची हत्या वाद आणि पैशांच्या देवाण घेवाणीमधून करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.  हत्या झालेला सेटों शेख हा बांगलादेशी नागरिकांसाठी बनावट आधारकार्ड तयार करायचा, अशी माहिती समोर आली आहे.

तपासामध्ये बांगलादेशींची भारतात घुसखोरी कशी घडवली जायची, याबाबतची माहितीही समोर आली आहे. ही गँग बांगलादेशी नागरिकांना जंगलाच्या माध्यमातून भारतामध्ये आणायची. भारतात आल्यानंतर त्यांना सिमकार्ड आणि काही रोख रक्कम दिली जायची. कागदपत्रं तयार करण्यासाठी जनता प्रिंट्स नावाच्या एका बनावट संकेतस्थळाची मदत घेतली जायची. ही वेबसाईट रजत मिश्रा नावाची व्यक्ती २०२२ पासून चालवायची. तसेच केवळ २० रुपयांमध्ये आधारकार्ड, मतदार कार्ड आणि पॅनकार्ड यासारखी कागदपत्रे प्रिंट करून द्यायचा. पोलिसांनी या रॅकेटची प्रमुख असलेल्या मुन्नी देवी हिलाही अटक केली आहे. तपासामध्ये ४ बनावट मतदार कार्ड, २१ आधारकार्ड आणि ६ पॅनकार्ड जप्त केले आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीIndiaभारतBangladeshबांगलादेश