धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 10:19 IST2025-07-26T10:17:50+5:302025-07-26T10:19:59+5:30
घरात खेळत असणाऱ्या एक वर्षाच्या मुलाजवळ एक नाग आला. या मुलाला त्याचे खेळणे वाटले, त्याने त्या नागाला चावा घेऊन दोन तुकडे केले. यामध्ये त्या नागाचा मृत्यू झाला.

धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
आपल्याला कुठेही नाग दिसला तर भीती वाटते. सगळ्यांनाच घाम फुटतो. आपल्याला जर कुठे नाग दिसला तर आपण वाट बदलून जातो. पण त्याच्या वाट्याला जात नाही. पण, बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक वर्षाच्या मुलाने विषारी नागाला दातांनी चावले. त्यामुळे साप जागीच मरण पावला. चावल्यानंतर काही तासांनी तो मुलगाही बेशुद्ध पडला.
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
ही घटना पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मझौलिया ब्लॉकमधील मोहाची बंकटवा गावात घडली. मुलाला बेशुद्ध अवस्थेत मझौलिया पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, त्याला बेतिया येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रेफर करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील सुनील साह यांचा एक वर्षाचा मुलगा गोविंदा शुक्रवारी दुपारी त्यांच्या घरात खेळत होता. त्या मुलाची आजी मातेश्वरी देवी यांनी सांगितले की, याच दरम्यान घरात दोन फूट लांबीचा नाग बाहेर आला. मुलाने नागाला खेळणे समजून पकडले. नंतर त्याने त्याला दातांनी चावले. त्यानंतर काही वेळातच नागाचा मृत्यू झाला. मुलाने नागाला चावून त्याचेही दोन तुकडे केल्याचे सांगण्यात येत आहे.
मुलाची प्रकृती धोक्याबाहेर
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला विषबाधेची कोणतीही लक्षणे नाहीत. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मुलाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर कुटुंबीय घाबरले. त्याचबरोबर मुलाच्या चाव्यामुळे नागाचा मृत्यू झाल्यामुळे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.