शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

धक्कादायक! पतीनं लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट दिलं नाही; नाराज पत्नीनं चाकूनं केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 14:29 IST

लग्नाच्या वाढदिवशी पतीनं गिफ्ट न दिल्यानं संतापलेल्या पत्नीनं त्याच्यावर चाकूने वार केले.

सोशल मीडियाच्या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. अनेकदा प्रसिद्धीसाठी तरूणाई भन्नाट व्हिडीओ बनवत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धीही मिळते. नेहमी सोशल मीडियावर काही ना काही अनोख्या घटना समोर येत असतात. आता अशीच एक अनोखी अन् धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या वाढदिवशी पतीनं गिफ्ट न दिल्यानं संतापलेल्या पत्नीनं त्याच्यावर चाकूनं वार केले. बंगळुरूतील या धक्कादायक घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

खरं तर झालं असं की, लग्नाच्या वाढदिवशी पतीनं कोणतीही भेट न दिल्यानं संतप्त झालेल्या पत्नीनं पतीवर हल्ला केला. तो झोपला असता तिनं त्याच्यावर चाकूनं वार केले. बंगळुरूतील बेलांदूर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित जखमी पती किरण (नाव बदलले आहे) हा एका खासगी कंपनीतील कर्मचारी आहे. त्याचे वय ३७ वर्ष असून त्याची पत्नी ३५ वर्षीय संध्याने (नाव बदलले आहे) माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडवून आणली. 

पोलिसांत गुन्हा दाखल 

किरणने पोलिसांना सांगितले की, २७ फेब्रुवारी रोजी रात्री १.३० वाजता गाढ झोपेत असताना संध्याने स्वयंपाकघरातील चाकू घेऊन त्याच्या हातावर वार केले. रुग्णालयाकडून वैद्यकीय कायदेशीर प्रकरणाचा अहवाल मिळाल्यानंतर बेलंदूर पोलिसांनी १ मार्च रोजी संध्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. पोलिसांनी या जोडप्याला काही वेळ खासगीत चर्चा करण्यास आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी परवानगी दिली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारीच्या पहाटे ही घटना घडली. लग्नाच्या वाढदिवशी पतीनं कोणतेही गिफ्ट न दिल्यानं नाराज होऊन पत्नीनं किरणवर किचनमधील चाकूनं वार केले. किरणच्या आजोबांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यानं लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये रस घेतला नाही. सुदैवानं संध्यानं केलेला हल्ला रोखण्यात किरणला यश आलं. त्याच्या हाताला दुखापत झाली पण  शेजाऱ्यांच्या मदतीनं त्यानं वैद्यकीय मदत घेतली, ज्यामुळे पोलिसांनाही माहिती मिळाली. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकBengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस