शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुलाच्या मानेवर चाकू ठेऊन पतीसमोर महिलेवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 11:21 IST

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात पतीसमोर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात पतीसमोर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मुलाच्या मानेवर चाकू ठेवून तसंच बंदूकीचा धाक दाखवून महिलेला ऊसाच्या शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला.

मुजफ्फरनगर- उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात पतीसमोर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जिल्हापासून जवळ असलेल्या भोपा कस्बे भागात घडली. शुक्रवारी सकाळी पीडित महिला तिच्या पतीसोबत गाडीवरून एका गावातून परतत असताना ही घटना घडली. यामध्ये सगळ्यात धक्कादायक म्हणजे पीडित महिला आणि तिच्या पतीसोबत त्यांचं तीन महिन्याचं बाळ होतं. मुलाला डॉक्टरांकडे घेऊन हे दांपत्य गेलं होतं. तिथून परतत असताना ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे. पोलीस अधीक्षक अजय सचदेव यांनी ही माहिती दिली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकरा वाजता निरगाजनी गावाजवळच्या रस्त्यावर कारमध्ये असलेल्या चार जणांनी महिला आणि तिच्या पतीला घेरून त्या मुलाला त्यांच्याकडून हिसकावून घेतलं. तसंच पीडितेच्या पतीला बांधून ठेवलं. त्यानंतर मुलाच्या मानेवर चाकू ठेवून तसंच बंदूकीचा धाक दाखवून महिलेला ऊसाच्या शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला. या घटनेची कुठेही माहिती द्यायची नाही, अशी धमकीही या नराधमांनी त्या दोघांना दिली. आरोपी पीडित महिलेच्या पतीला मारहाण करून ते तेथून पसार झाले. घटनास्थळी त्या दोघांनी आरडाओरडा केल्यानंतर बाजूच्या गावातील काही लोक तेथे त्यांची मदत करण्यासाठी आले. तुमच्या मुलाला मारून टाकू अशी धमकी आरोपी देत असल्याचं पीडित महिलेने सांगितलं आहे. 

गावातील नागरिकांनी पोलिसांना या घटनेती माहिती दिली असून महिलेला आणि तिच्या पतीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आलं आहे. याप्रकरणी चार जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आरोपींची अजूनही ओळख पटलेली नाही. 

दरम्यान, आधी ऑगस्ट महिन्यात मुज्जफरनगरमध्ये अशा प्रकारची घटना घडली होती. अकरावीमध्ये शिकणाऱ्या तरूणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. पीडित तरूणी त्या नराधमांना ऊसाच्या मळात तिच्या मित्राबरोबर सापडली होती. या घटनेनंतर तीनही आरोपींना अटक करण्यात आलं. 

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाUttar Pradeshउत्तर प्रदेशWomenमहिला