शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक, मृतदेहांची झाली अदलाबदल; अनोळखी मृतदेहावर केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 16:14 IST

मृतदेह बदलण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिका-यांवर गंभीर आरोप होत आहेत. चेहरा न दाखवता मृतदेह कुटुंबाकडे सोपवला, असा आरोप केला जात आहे.

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे मृतदेहांची अदलाबदल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग्रा आरोग्य विभाग आणि शवविच्छेदनगृहातील कामगारांच्या निष्काळजीपणामुळे ही मोठी चूक झाली. विशेष म्हणजे आग्रा कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट बनले आहे. आग्रा हे उत्तर प्रदेशामधील सर्वाधिक बाधित शहरांपैकी एक आहे. आग्रामध्ये राहणारे शोएबच्या वडिलांचा 10 मे रोजी कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी शोएबला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सोपवण्यात आला. तर शोएबच्या वडिलांचा मृतदेह हा मनोज नावाच्या व्यक्तीला सोपवण्यात आला. परिणामी, शोएबच्या वडिलांच्या मृतदेहावर भलत्याच कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. या कुटुंबाने हिंदू प्रथेनुसार मृतदेहाचे अंतिम संस्कारही केले. मात्र नंतर एसएन मेडिकल कॉलेजने मृतदेहाची अदलाबदल केल्याचे उघडकीस आले.

मृतदेह बदलण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिका-यांवर गंभीर आरोप होत आहेत. चेहरा न दाखवता मृतदेह कुटुंबाकडे सोपवला, असा आरोप केला जात आहे. अशा परिस्थितीत शोएबच्या वडिलांचा मृतदेह दुसर्‍या कुटुंबात पोहोचला आणि अंत्यसंस्कारही केले गेले. त्याचदरम्यान खवसपुरामधील शहागंज कुटुंब देखील मृतदेह घेण्यासाठी शवविच्छेदनगृहात पोहोचले होते, या कुटुंबाला अद्याप वडिलांचा मृतदेह सापडलेला नाही.

कोरोनाच्या कहरात शोएबच्या आईचेही पाच दिवसांपूर्वी निधन झाले होते. आता कुटुंबात फक्त शोएब आणि त्याचा धाकटा भाऊ आहे. आग्रा शहराला कोरोना विषाणूचा जास्त परिणाम झाला आहे. आग्राचे महापौर नवीन जैन यांनीही या शहराला 'देशाचे वुहान' असे म्हटले आहे. आग्रामध्ये कोरोना विषाणूची 44 हॉटस्पॉट्स आहेत, त्यापैकी 3 ग्रामीण भागात आढळून आली आहेत. आग्रा येथे एका पत्रकाराचा मृत्यू झाला असून, 15 हून अधिक पत्रकारांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या