शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भारतात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या १८ कोटींवर; WHO ने जारी केली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 20:24 IST

जीवनशैलीच्या आजारांमुळे अकाली मृत्यूंची संख्या अंदाजे 22 टक्के

Indians, Blood Pressure: जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील उच्च रक्तदाब रुग्णांची आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, 1990 ते 2019 दरम्यान उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. उच्च रक्तदाबाचे रुग्ण 1990 मध्ये 65 कोटींवरून 2019 मध्ये 130 कोटींवर पोहोचले आहेत. त्यापैकी 1 कोटी 80 लाख लोकांचा केवळ उच्च रक्तदाबामुळेच अकाली मृत्यू झाल्याची माहिती आहे. म्हणजेच त्यांचे बीपी नियंत्रणात असते तर आज हे लोक दगावले नसते असे तज्ज्ञांचे मत आहे. भारताबद्दल बोलायचे झाल्यास तब्बल 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत.

 जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांपैकी अर्ध्या रुग्णांना उच्च रक्तदाब असल्याचे माहीत नसते. जगातील 30 ते 79 वर्षे वयोगटातील उच्च रक्तदाब रुग्णांपैकी केवळ अर्धे म्हणजे 54% असे आहेत ज्यांना उच्च रक्तदाब असल्याचे माहित आहे. उच्च रक्तदाबावर उपचार घेत असलेल्यांची संख्या 42% आहे. जगात असे फक्त २१% रुग्ण आहेत ज्यांचा रक्तदाब नियंत्रणात आहे.

अहवालात काय आहे माहिती?

  • 5 पैकी 4 लोकांना योग्य उपचार मिळत नाहीत
  • जगातील प्रत्येक 3 पैकी 1 व्यक्ती उच्च रक्तदाबाचा रुग्ण
  • 50 टक्के रूग्णांना उच्च रक्तदाब असल्याची माहितीच नसते
  • उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, किडनी खराब होण्याचा धोका

WHO च्या 2019 च्या आकडेवारीनुसार, भारतात 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत. यापैकी ३७ टक्के रुग्णांना त्यांच्या आजाराची माहिती आहे. 30 टक्के उच्च रक्तदाबावर उपचार घेत आहेत. भारतातील केवळ 15 टक्के रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात आहे. डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार, जीवनशैलीच्या आजारांमुळे अकाली मरण पावलेल्या लोकांची एकूण अंदाजे संख्या 22% आहे. यापैकी २५% पुरुष आणि १९% महिला असतील.

2019 च्या आकडेवारीनुसार, भारतात 25 लाख 66 हजार लोक हृदयविकाराचे बळी ठरले आहेत. त्यापैकी 14 लाख 51 हजार पुरुष आणि 11 लाख 16 हजार महिला आहेत. 2019 मध्ये भारतात हृदयविकारामुळे झालेल्या 52% मृत्यूंमागे उच्च रक्तदाब हे सर्वात मोठे कारण होते. मरण पावलेल्यांपैकी ५१% पुरुष आणि ५४% महिला होत्या.

टॅग्स :Healthआरोग्यWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाIndiaभारत