शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : मद्य कारखान्यात काम करत होती ५८ बालके; स्कूलबसमधून न्यायचे अन् काम करून घ्यायचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 11:02 IST

नियम धाब्यावर बसवून बालकामगारांना तुटपुंज्या वेतनात राबवून घेतले जात होते.

 रायसेन :मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील एका मद्य कारखान्यात चिमुकल्यांकडून काम करवून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, तेथून ५८ बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) बचपन बचाओ आंदोलनाच्या (बीबीए) सहकार्याने शनिवारी सोम डिस्टिलरीवर कारवाई केली.

एनसीपीसीआरचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोम डिस्टिलरीवर छापा टाकून १९ मुली, ३८ मुलांची सुटका केली. मुलांच्या हातावर हानिकारक रसायने आणि अल्कोहोलमुळे जळण्याच्या खुणा होत्या. मालक या मुलांना दररोज स्कूल बसमधून कारखान्यात पाठवत होता. गुदमरायला होईल, अशा दुर्गंधीयुक्त वातावरणात त्यांच्याकडून १२ ते १४ तास काम करून घेतले जात होते. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. संबंधित विभागांकडून याची माहिती घेण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. नियम धाब्यावर बसवून बालकामगारांना तुटपुंज्या वेतनात राबवून घेतले जात होते.

उत्पादन शुल्क विभागाचे चारजण निलंबितबालकामगारप्रकरणी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर उत्पादन शुल्क आयुक्तांनी रायसेनचे प्रभारी जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी कन्हैयालाल अतुलकर, उपनिरीक्षक प्रीती उईके, शेफाली शर्मा व मुकेश श्रीवास्तव यांना निलंबित केले.

पोलिस, प्रशासन  कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोपपोलिसांनी कारखान्याच्या संचालकावर गुन्हा दाखल केला. मात्र, रात्री उशिरा आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी पोलिस व प्रशासन कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ज्या बालकांची सुटका करण्यात आली. त्यांना पोलिसांनी गायब केले असून, कंपनीवर जामीनपात्र कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. कारवाईत सुधारणा न झाल्यास आपण न्यायालयात जाऊ, अशा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :liquor banदारूबंदीCrime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश