धक्कादायक...10 वर्षाचे मुलीवर बापाने केला बलात्कार

By Admin | Updated: May 15, 2017 06:59 IST2017-05-15T06:59:04+5:302017-05-15T06:59:04+5:30

कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर ठेवते. पण त्याच वडिलांनी जर तिच्यावर अत्याचार केला आहे.

Shocking ... 10 year old girl raped by her father | धक्कादायक...10 वर्षाचे मुलीवर बापाने केला बलात्कार

धक्कादायक...10 वर्षाचे मुलीवर बापाने केला बलात्कार

ऑनलाइन लोकमत
रोहतक, दि. 15 - कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर ठेवते. पण त्याच वडिलांनी जर तिच्यावर अत्याचार केला आहे. हरयाणामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका 10 वर्षाच्या चिमुरडीवर सावत्र बापानं बलात्कार केल्याने ती मुलगी 5 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना हरयाणामधील रोहतक येथे उघडकीस आली आहे.
सध्या रोहतकमधील दुर्गा कॉलनीत वास्तव्याला असलेल्या आरोपीचं नाव सुरेश असून तो मूळचा बिहारचा आहे. मुलीच्या आईनं मुलीला हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले. मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून सावत्र बापाविरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती डीएसपी रमेश कुमार यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून सुरेश हा 10 वर्षाच्या मुलीवर बळजबरीनं बलात्कार करत होता. तसेच याबाबत बाहेर काही बोलल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता अशी माहिती मुलीच्या आईनं पोलिसांना दिली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सुरेशविरुद्ध ५०६ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पीडित मुलीवर पीजीआयएमएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Shocking ... 10 year old girl raped by her father