शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला दे धक्का; मोदी सरकारवर टीका करणारा बॉक्सर विजेंदर सिंग भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 15:37 IST

काँग्रेसकडून विजेंदर सिंग यांना मैदानात उतरवले जाणार होते. मात्र, तत्पूर्वीत सिंग यांनी भाजपात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

नवी दिल्ली - सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने मोदी सरकारवर टीका करणाऱ्या बॉक्सर आणि सुवर्णपदक विजेत्या विजेंदर सिंगनेभाजपात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे २०१९ साली दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजेंदर सिंगनेकाँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे, विजेंदर सिंगने काँग्रेस सोडून भाजपाचं कमळ हाती घेतल्यानं काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, मथुरा लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार हेमा मालिनी यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून विजेंदर सिंग यांना मैदानात उतरवले जाणार होते. मात्र, तत्पूर्वीत सिंग यांनी भाजपात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

विजेंदर सिंग यांनी सातत्याने मोदी सरकारविरुद्ध भूमिका घेतली. दिल्लीतील शेतकरी आंदोलन असो किंवा महिला कुस्तीपटूंचं आंदोलन असो, विजेंदर सिंगने ट्विटरवरुन भूमिका मांडताना मोदी सरकारला लक्ष्य केलं. विशेष म्हणजे त्यांनी कालपर्यंत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या पोस्ट रिट्विट केल्या आहेत. विशेष म्हणजे मोदींना ट्रोल करणाऱ्या काँग्रेसच्या पोस्ट त्यांनी काल रिट्विट केल्या आणि आज भाजपाचा गमछा गळ्यात घातला.  देशाच्या विकासासाठी मी भाजपात प्रवेश करत असल्याचे विजेंदर सिंगने म्हटले. भाजपाच्या दिल्ली मुख्यालयात भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांच्याहस्ते विजेंदर सिंग यांचा पक्षात प्रवेश झाला. त्यावेळी, त्यांनी भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. आता, लोकसभा निवडणुकीच्या मैदानात भाजपाकडून त्यांना उतरवलं जाण्याची शक्यता आहे. 

मी पक्षांतर केलं असलं तरी चुकीला चूक आणि बरोबरला बरोबरच म्हणणार आहे. मी भाजपामध्ये सहभागी होऊन अनेक खेळाडूंच्या भवितव्यासाठी काम करणार आहे, असेही विजेंदर सिंगने म्हटले. दरम्यान, विजेंदर सिंगने राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी होत मोदी सरकारविरुद्ध आवाज उठवला होता. राहुल गांधींच्या यात्रेचं कौतुक करत, त्यांच्यासोबत यात्रेत पायी चाललाही होता. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसVijender Singhविजेंदर सिंगlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४