शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शोभा डे यांनी फेटाळला पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 06:40 IST

शोभा डे यांनी पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे

मुंबई - प्रसिद्ध भारतीय लेखिका शोभा डे यांनी आपल्या सांगण्यानुसार काश्मीर प्रश्नी पाकिस्तानच्या कलाने लेख लिहिला होता, असा दावा पाकिस्तानचेभारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केला होता. दरम्यान, बासित यांचा दावा शोभा डे यांनी फेटाळून लावला आहे. बासित यांचे वक्तव्य धोकादायक आणि दुर्भावनेने  प्रेरित असल्याचा टोला शोभा डे यांनी लगावला आहे. अब्दुल बासित यांनी केलेला दावा फेटाळून लावताना शोभा डे म्हणाल्या की, ''मी एक देशभक्त भारतीय नागरिक आहे. बासित यांनी केलेल्या आरोपांमुळे अपमानित झाल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे.'' अब्दुल बासित हे 2014 मध्ये भारतात उच्चायुक्त म्हणून नियुक्त झाले होते. 

बासित अली यांनी हल्लीच ट्विटरवर एक व्हिडीओ इंटरव्ह्यू शेअर केला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, '' 2016 मध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हाण वानीच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये आंदोलकांविरोधात  पॅलेट गनचा वापर आणि आर्थिक नाकेबंदी करण्यात येत होती. मात्र भारतीय पत्रकारांकडून याबाबत फार काही लिहिले जात नव्हते. त्यावेळी कुठल्याही भारतीय पत्रकाराला काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराच्या बाजूने लिहिण्यास राजी करणे आव्हानात्मक होते. मात्र शोभा डे यासाठी राजी झाल्या. त्यानंतर त्यांनी एका लेखात लिहिले की काश्मीर प्रश्नावर सार्वमत घेऊन हा प्रश्न कायमचा सोडवण्याची वेळ आली आहे.''मात्र बासित अब्दुल यांच्या दाव्यामुळे शोभा डे यांचा तीळपापड झाला आहे. ''मी सहजा अशा वक्तव्यांबाबत प्रतिक्रिया देत नाही. मात्र आता खोट्याला उघडे पाडण्याची वेळ आली आहे. विशेषकरून हा दावा अशा नीच व्यक्तीने केला आहे जो केवळ मलाच नाही तर माझ्या देशाला बदनाम करू इच्छित आहे.''  

टॅग्स :Shobha deशोभा डेIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर