शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धांजलीच्या ट्विटमध्ये चिरंजीवीचा फोटोच चुकवला; शोभा डेंची नेटकऱ्यांकडून 'शाळा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 18:43 IST

 प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचं ७ जूनला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा याचे वयाच्या 39 व्या वर्षी सोमवारी निधन झाले. देशभरातील अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावरून चिरंजीवी याला श्रद्धांजली वाहिली.  प्रसिद्ध भारतीय लेखिका शोभा डे यांनीही सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला. पण, त्यांना त्या ट्विटवर नेटिझन्सच्या रागाचा सामना करावा लागला. नेमकं असं काय घडलं?

शोभा डे यांनी शोक व्यक्त करताना चिरंजीवी सरजाच्या जागी तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी कोनिडेला याचा फोटो वापरला आणि श्रद्धांजली वाहिली. पण, अवघ्या काही मिनिटांत चूक लक्षात येताच त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. तरीही काही नेटिझन्सनी स्क्रीन शॉट काढून शोभ डे यांना ट्रोल केले. शोभा डे यांनी लिहिले होते की,''आणखी एक दिग्गज अभिनेता हरपला. त्याला श्रंद्धांजली वाहताना, त्याच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करते.''

त्यानंतर नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले. एकाने लिहिले की,''प्रिय बॉलिवूड सेलिब्रेटी/ तुम्ही कोणी आहात त्या. तुम्हाला जर आमच्या अभिनेत्याबद्दल माहित नसेल, तर कृपया ट्विट करू नका. तुमचा मुर्खपणा गुगल सर्चवरही शोधून सापडत आहे.'' काहींनी शोभा डे यांना माफी मागण्यास सांगितले.    प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचं ७ जूनला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी केवळ वयाच्या ३९व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. चिरंजीवी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे शनिवारी बंगळूरु येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. राजकीय आणि मनोरंजन विश्वातील अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चिरंजीवी यांनी २००९ मध्ये वायूपुत्र या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी २२ कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. यातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट 

Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही!

Video : बॉलिवूड सेलिब्रेटींनंतर डेव्हिड वॉर्नर बनला 'या' डान्सरचा जबरा फॅन; तुम्हीही पडाल प्रेमात

न्यूड फोटोनंतर मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला पार्टीतला Video; ट्रोलर्संना सुनावले खडे बोल!

OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार!

धक्कादायक; Racing Carमध्ये इतिहास घडवणारी महिला रेसर बनली 'Porn Star', अन्...

टॅग्स :Shobha deशोभा डेSocial Mediaसोशल मीडिया