शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना खासदार संजय राऊत उवाच; व्यंकय्या नायडू नियमानुसारच वागले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 17:13 IST

उदयराजेंनी दिलेल्या घोषणांना उपराष्ट्रपतींनी आक्षेप घेतल्यानं नवा वाद; महाविकासआघाडीकडून भाजपा लक्ष्य

मुंबई: 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणेला राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात घेतलेल्या आक्षेपावरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांकडून भाजपाला लक्ष्य केलं जात असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यंकय्या नायडू यांना क्लीन चिट दिली आहे. 'व्यंकय्या नायडू हे सभागृहाच्या नियमानुसार वागले, पण छत्रपती शिवरायांबद्दल आमच्या काही भावना आहेत. त्या आम्ही मांडत आहोत, असं राऊत म्हणाले. 'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा जय हिंद आणि वंदे मातरम् इतकीच महत्त्वाची असल्याचं त्यांनी म्हटलं.राज्यसभेत काल नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी संपन्न झाला. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी 'जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. त्याला सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. ही घोषणा रेकॉर्डवरून काढून टाकण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी भाजपावर तोफ डागली आहे. मतांसाठी शिवराय चालतात. मग त्यांच्या नावाच्या घोषणा का चालत नाहीत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर हल्ला चढवला. 'भाजपचं तोंड बंद का? संभाजी भिडे यांनी आता सांगली, सातारा बंदची हाक का दिली नाही?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर खुद्द उदयनराजे यांनी सगळ्या वादावर खुलासा केला. राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही. सभागृहात असं काही घडलंच नाही. शरद पवारही तिथं होते. त्यामुळं कुणीही राजकारण करू नये,' असं आवाहन त्यांनी केलं.उदयनराजे भोसले यांच्या खुलाशानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यंकय्या नायडू नियमानं वागल्याचं म्हटलं. नायडू उपराष्ट्रपती आहेत. राज्यसभेचे सभापती आहेत. नियमांचं काटेकोर पालन करणारे आहेत. त्यांच्या दृष्टीनं म्हणाल, तर ते बरोबर आहेत. संसदीय लोकशाही व कामकाजाचे कायदे यांची त्यांना जाण आहे. आम्ही सगळे त्यांचं ऐकतो. त्यांचा आदर करतो. पण शिवरायांबद्दल आमच्या काही भावना आहेत. नियम आणि भावना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 'जय भवानी आणि जय शिवाजी' ही घोषणा नियमबाह्य घटनाबाह्य नाही. ती असू नये, असं आमचं म्हणणं आहे. 'जय हिंद आणि वंदे मातरम्' इतकीच ती महत्त्वाची आहे,' असं राऊत यांनी म्हटलं.संजय राऊतांच्या प्रश्नावर उदयनराजेंचं उत्तर, शिवसेनेलाही केलं टार्गेट"मला छत्रपती शिवरायांबद्दल आदर अन् मी आई भवानीचा उपासक" - व्यंकय्या नायडू"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी