शिवराजसिंह चौहान यांना पितृशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 05:00 IST2019-05-26T05:00:13+5:302019-05-26T05:00:15+5:30

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांचे वडील प्रेमसिंह चौहान (८२) यांचे लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी दुपारी निधन झाले.

 Shivraj Singh Chauhan, father of the father | शिवराजसिंह चौहान यांना पितृशोक

शिवराजसिंह चौहान यांना पितृशोक

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांचे वडील प्रेमसिंह चौहान (८२) यांचे लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी दुपारी निधन झाले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रेमसिंह चौहान यांच्या मागे चार मुले, एक मुलगी असा परिवार आहे. भोपाळमध्ये असलेले शिवराजसिंह चौहान वडीलांच्या निधनाचे वृत्त कळताच तातडीने मुंबईला रवाना झाले.
प्रेमसिंह चौहान यांच्या निधनाबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे, भाजपचे कैलाश झा आदींनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Web Title:  Shivraj Singh Chauhan, father of the father