शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्याविरोधात काका! शिवपाल यादव यांनी केली समाजवादी सेक्युलर मोर्चाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 13:21 IST

मुलायम सिंह यादव कुटुंबीयांमधील संघर्ष तीव्र झाला असून, बऱ्याच काळापासून समाजवादी पक्षात बाजूला पडलेले समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील माजी प्रदेशाध्यक्ष आणि मुलायम सिंह यांचे भाऊ शिवपाल यादव यांनी

लखनौ - मुलायम सिंह यादव कुटुंबीयांमधील संघर्ष तीव्र झाला असून, बऱ्याच काळापासून समाजवादी पक्षात बाजूला पडलेले समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील माजी प्रदेशाध्यक्ष आणि मुलायम सिंह यांचे भाऊ शिवपाल यादव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. शिवपाल यादव यांनी समाजवादी सेक्युलर मोर्चा नावाने पक्ष स्थापन केला आहे. समाजवादी पक्षातील उपेक्षित लोकांना या पक्षाशी जोडण्याचे काम करणार असल्याचे शिवपाल यादव यांनी सांगितले आहे. तसेच  समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव हे सुद्धा या पक्षात दाखल होतील, दावा शिवपाल यादव यांनी केला आहे.मुलायम सिंह यादव यांना सन्मान मिळत नसल्याने आपण दुखावले गेल्याचे शिवपाय यादव यांनी म्हटले आहे. वाट पाहता पाहता दीड वर्ष उलटून गेले आहे. शेवटी उपेक्षा तरी किती सहन करायची? सहनशक्तीलाही काही मर्यादा असतात, असे शिवपाल यादव यांनी रक्षाबंधना दिवशी बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर म्हटले होते. दरम्यान, उत्तर प्रदेशात भाजपाचा सहयोगी पक्ष असलेल्या भारतीय सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (एसबीएसपी) चे अध्यक्ष आणि योगी सरकारमध्ये मंत्री असलेले ओम प्रकाश राजभर यांनी मंगळवारी शिवपाल यादव यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यामुळे शिवपाल यादव हे सुद्धा या पक्षात सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर शिवपाल यादव मुलायम सिंह यांची भेट घेण्यासाठी जाण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीPoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेश