सावळदबारा येथे शिवाजी विद्यालय व कै. लक्ष्मणराव कोलते कॉलजेमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात
By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:59+5:302016-02-01T00:03:59+5:30
स्नेहसंमेलनात आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत

सावळदबारा येथे शिवाजी विद्यालय व कै. लक्ष्मणराव कोलते कॉलजेमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात
स नेहसंमेलनात आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबास आर्थिक मदतसावळदबारा : सावळदबारा येथे शिवाजी विद्यालय व कै. लक्ष्मणराव कोलते कॉलेज येथे दोन दिवसांचे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करून आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यात आली. शिवाजी विद्यालय व कै. लक्ष्मणराव कोलते कॉलेज येथे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मोहन राठोड हे होते. व जय कालंका शिक्षण संस्था संचलितचे अध्यक्ष भावराव कोलते यांच्याकडून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव डॉ. इंद्रजित सोळुंके यांचे स्वागत प्राचार्य एन. आर. कोलते यांनी केले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे प्रास्तावीक जीवन कोलते यांनी करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी शेतकर्यांच्या जीवनावर नाटक (लोककला) डान्स, पोवाडे, शेरो-शायरी आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य नारायण कोलते व त्यांच्या पत्नी रत्नाबाई कोलते यांच्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबास प्रत्येकी १५०० रुपयांची मदत देण्यात आली.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पंचायत समितीचे सभापती जयप्रकाश चव्हाण, सरपंच सरला कोळपे, उपसरपंच वसंता चोरमले, माजी सरपंच समाधान सूरडकर, शांताराम खराटे, चेअरमन ज्ञानदेव खडके, ग्रा. पं. सदस्य संजय राजपूत, प्रमोद काळे, म. आरिफ, पंजाब देशमुख, मदन डोखळे, विनोद टिकारे, गणेश खैरे, संदीप कोलते, दीपक सपाटे, दीपक शेळके, गणेश कोलते, अंकुश कोलते, किशोर रावळकर, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, आभार प्राचार्य नारायण कोलते यांनी मानले.कॅप्शन...जय कालंका देवी शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी. टिकारे यांच्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबास मदत देताना.