शिवाजी नगर हुडकोत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Updated: April 16, 2016 00:36 IST
जळगाव: शिवाजी नगर हुडको भागात राहणार्या सुमयाबी इम्रान खान (वय २४) या विवाहितेने शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरात ओढणी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येपूर्वी तिने दुपारी अडीच वाजता बहिणीला फोन करुन घरी येण्याची विनंती केली होती, त्यामुळे ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता.
शिवाजी नगर हुडकोत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव: शिवाजी नगर हुडको भागात राहणार्या सुमयाबी इम्रान खान (वय २४) या विवाहितेने शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरात ओढणी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येपूर्वी तिने दुपारी अडीच वाजता बहिणीला फोन करुन घरी येण्याची विनंती केली होती, त्यामुळे ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता.सुमयाबी ही पती इम्रान खान, मुलगी आयशा (वय ४) असे एकत्र राहत होते. दुसरी मुलगी फातिमा (वय १ वर्ष) ही नणंदेकडे राहत होती, तिला मी विकत घेतले आहे असे नणंद सांगत असायची पती, नणंद व अन्य सासरच्या लोकांकडून तिला सतत त्रास दिला जात होता, याबाबत गेल्या महिन्यात शहर पोलीस स्टेशनला तक्रारही करण्यात आली होती,तसेच आज घटना घडली तेव्हा तिचा पती घरीच होता, त्यामुळे हा घातपातच असल्याचा आरोप बहीण हिनाबी शेख रहीम यांनी जिल्हा रुग्णालयात पत्रकारांजवळ केला. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.