शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेनेचा नाराजीचा सूर, शपथविधीला अनुपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 12:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेकडून नाराजीचा सूर आळवण्यात आला असून, शिवसेना मंत्र्यांच्या शपथविधीला अनुपस्थित राहिली.

नवी दिल्ली, दि. 3 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेकडून नाराजीचा सूर आळवण्यात आला. शिवसेना मंत्र्यांच्या शपथविधीला अनुपस्थित राहिली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामधील मतभेत पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमडळ विस्ताराची आखणी केली . तसेच मंत्रिमंडळ विस्तारात केवळ भाजपाच्याच मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात  भाजपाचे खासदार अश्विनीकुमार चौबे (बिहार), वीरेंद्र कुमार (मध्य प्रदेश) शिवप्रताप शुक्ल (उत्तर प्रदेश)  यांचा समावेश आहे. त्याबरोबरच गजेंद्रसिह शेखावत, मुंबईचे माजी पोलीस प्रमुख सत्यपाल सिंह आणि कन्ननथनम अल्फोन्स हेसुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंह आणि माजी आयएफएस अधिकारी हरदीप पुरी यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.  राजधानीत मंत्रिमंडळ विस्तार व फेरबदल होणार असतानाच, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची मागणी केल्याने पक्षनेते व मंत्र्यांना धक्का बसला  होता. परराष्ट्र खाते सोडून संरक्षण मंत्रिपद स्वीकारण्यात मला आनंदच होईल, असे त्यांनी म्हटले होते.पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारावा, असा सल्ला स्वराज यांनी दिला. आधी अनेक पंतप्रधानांनी परराष्ट्र खाते सांभाळले आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे. पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्रालय आपल्याकडे ठेवल्यास या खात्याला तीन राज्यमंत्री असण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक हरदीप सिंग पुरी असतील.पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव संरक्षणमंत्रिपदासाठी असले तरी त्याला अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. मात्र त्यांच्यासह पीयूष गोयल  यांना पदोन्नती मिळाली आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी