शिवसेनेची भिस्त शहराबाहेरील नेतृत्वावर जिल्हा प्रमुखपद रिक्तच : शिंदे, विचारे ,नाहटांवर निवडणुकीची धुरा
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:25+5:302015-03-06T23:07:25+5:30
नामदेव मोरे,नवी मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढली आहे. पक्षाची ताकद वाढली असली तरी सद्यस्थितीमध्ये जिल्हा प्रमुखपद रिक्त आहे. निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे व उपनेते विजय नाहटा यांच्यावर सोपविण्यात आली. स्थानिक नेतृत्व सक्षम नसल्यामुळे शहराबाहेरील नेत्यांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

शिवसेनेची भिस्त शहराबाहेरील नेतृत्वावर जिल्हा प्रमुखपद रिक्तच : शिंदे, विचारे ,नाहटांवर निवडणुकीची धुरा
न मदेव मोरे,नवी मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढली आहे. पक्षाची ताकद वाढली असली तरी सद्यस्थितीमध्ये जिल्हा प्रमुखपद रिक्त आहे. निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे व उपनेते विजय नाहटा यांच्यावर सोपविण्यात आली. स्थानिक नेतृत्व सक्षम नसल्यामुळे शहराबाहेरील नेत्यांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इतर पक्षांमधून सेनेत येणार्यांची संख्याही वाढू लागली आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँगे्रसच्या ५ व काँगे्रसच्या ४ नगरसेवकांनी शिवबंधन बांधले आहे. नगरसेविका इंदुमती भगत व सिंधू नाईक या फक्त तांत्रिकदृष्ट्या काँगे्रसमध्ये आहेत, त्या लवकरच सेनेत येतील. अजून काही नगरसेवक पक्षात प्रवेश करणार असल्यामुळे सेनेची ताकद वाढली आहे. आदेश बांदेकर यांचे विभागनिहाय कार्यक्रम घेऊन वातावरण निर्मिती करत आहेत. पक्षात येणार्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे नाराजांची संख्याही वाढू लागली आहे.विजय चौगुले यांनी पक्ष सोडल्यास त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसणार आहे. निवडणुकीमध्ये ज्यांना उमेदवारी मिळणार नाही तेही त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. चौगुले यांनी जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा दिल्यापासून ते पद भरण्यात आलेले नाही. जिल्हा प्रमुखपद नियुक्त केले तर पक्षातील वाद पुन्हा उफाळून येण्याची भीती असल्यामुळे निवडणुकीपर्यंत जिल्हा प्रमुखपद रिक्त ठेवले जाण्याची शक्यता आहे. स्थानिक नेतृत्व सक्षम नसल्यामुळेच निवडणुकीची जबाबदारी उपनेते विजय नाहटा, खासदार राजन विचारे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नाहटा यांनी काँगे्रस व राष्ट्रवादीमधील असंतुष्टांना पक्षात प्रवेश देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विभागनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. त्यांनी बेलापूर मतदार संघातून निवडणूक लढविली असली तरी अद्याप त्यांना शहरवासी मानले जात नाही. यामुळे विरोधकांकडून शिवसेनेवर टीका होत असून, निवडणुकीत या मुद्द्यावरून पक्षाला घेरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामधून पक्ष कसा मार्ग काढणार यावर पक्षाचे यश अवलंबून राहील. शिवसेना चौकट, नावाने स्वतंत्र फाईल टाकत आहे